कर बुडव्या हाॅस्पीटलवर प्राप्तीकरचे छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

प्राप्तिकर विभागाने औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील एका मोठे हॉस्पिटल, बीड बायपास रोडवरील हॉस्पिटल तसेच गजानन मंदिर रोडवरील एका डायग्नोस्टिक सेंटरवर छापे टाकले आहेत. दोन्ही रुग्णालये व डायग्नोस्टिक सेंटरमधील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : मागील आठवड्यात प्राप्तिकर विभागाने बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकल्यानंतर आता त्यांनी रुग्णालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे. करचुकवेगिरी करणाऱ्या जालन्यातील चार मोठ्या रुग्णालयांसह औरंगाबादेतील दोन रुग्णालये व एका डायग्नोस्टिक सेंटरवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी (ता.सहा) छापा टाकले. ही कारवाई अजून एक ते दोन दिवस चालणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

प्राप्तिकर विभागाने औरंगाबाद शहरातील चिकलठाणा परिसरातील एका मोठे हॉस्पिटल, बीड बायपास रोडवरील हॉस्पिटल तसेच गजानन मंदिर रोडवरील एका डायग्नोस्टिक सेंटरवर छापे टाकले आहेत. दोन्ही रुग्णालये व डायग्नोस्टिक सेंटरमधील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हे 

बांधकाम व्यावसायिकांचा रिकव्हरी सर्व्हे 

यासह औरंगाबाद येथील दोन नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर रिकव्हरी सर्व्हे करण्यात आला आहे. यांच्याकडून करचुकवेगिरी झाल्याचे उघड झाले. यामध्ये पुढील कारवाई प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येत आहे. मागील महिन्यात 21 ते 23 जानेवारीदरम्यान शहरातील दोन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तिकर विभागाने छापा मारला होता.

क्लिक करा : निकम साहेब... हे जेवण मीच बनवलेय ना!

करचुकवेगिरी प्रकारातून या बांधकाम व्यावसायिकांच्या औरंगाबाद, पुणे, नगर, बंगलोर यासह देशभरातील 43 ठिकाणांच्या कार्यालयात एकाच वेळी हे सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्या व्यावसायिकांकडे 250 ते 300 कोटींची अघोषित संपत्ती असल्याचे प्राथमिक तपासणी अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा : त्या रात्री तिला लॉजवर नेले मग फोटो व्हायरल झाले...

जालन्यातही कारवाई 

या आठवड्यात जालना येथील चार नामांकित रुग्णालयांवर करचुकवेगिरीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे प्राथमिक अहवालातून उघड झाले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून जवळपास दहा कोटींहून अधिक रुपयांची करचुकवेगिरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: income tax raid hospital in aurangabad