सिद्धेश्‍वर मुंडेंना २ हजार ५२५ मते, रमेश पोकळेंना ३ हजार ५०० मते; पहिल्या फेरीत बोराळकरांना फटका

गणेश पिटेकर
Thursday, 3 December 2020

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी गुरूवारी (ता.तीन) रात्री साडेआठला पूर्ण झाली आहे. यात अपक्ष उमेदवार सिद्धेश्‍वर मुंडेंनी २ हजार ५२५  मते, तर भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या रमेश पोकळे यांनी तीन हजार ५०० मते मिळावली आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी गुरूवारी (ता.तीन) रात्री साडेआठला पूर्ण झाली आहे. यात अपक्ष उमेदवार सिद्धेश्‍वर मुंडेंनी २ हजार ५२५ मते, तर भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या रमेश पोकळे यांनी तीन हजार ५०० मते मिळावली आहेत. या दोघा अपक्षांचा फटका भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना बसल्याचे पहिल्या फेरीत स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८५० मते, तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकरांना ११ हजार ५५८ मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीत वैध ५० हजार ६२० मते, तर अवैध ५ हजार ३८१ मते ठरली आहेत. तत्पूर्वी पहिल्या फेरीच्या ट्रेंडमध्ये सतीश चव्हाण हे आघाडीवर दिसत होते. हा ट्रेंड खरा झाल्याचे दिसत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतपत्रिकेवर काही मतदारांनी मराठा आरक्षणाविषयी लिहिले. दुसरीकडे काहींनी मोबाईल नंबर तर काहींनी गंमतीशरपणे स्वतःचे नावे लिहिल्याचे प्रकारसमोर आले आहेत. ही सर्व मते बाद होणार आहेत. एकूण एक हजार २६० पोस्टल मते आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent Siddheshwar Munde, Ramesh Pokale Votes Affect Boralkar