
जैन इंटनॅशनल स्कुल, शहानुरमियाँ दर्गा आणि युनिर्व्हसल हायस्कुल या दोन्ही शाळांबाबत आलेल्या पालकांच्या तक्रारी आणि वारंवार सूचना करुनही समितीच्या पाहणीत आलेली अनियमित्ता पाहता. शासनाकडे या दोन्ही शाळांच्या मान्यता रद्द करणे, (बोर्ड संलग्नतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र) सीबीएसईचे संलग्नीकरण रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून, कारवाई संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : जैन इंटनॅशनल स्कुल, शहानुरमियाँ दर्गा आणि युनिर्व्हसल हायस्कुल या दोन्ही शाळांबाबत आलेल्या पालकांच्या तक्रारी आणि वारंवार सूचना करुनही समितीच्या पाहणीत आलेली अनियमित्ता पाहता. शासनाकडे या दोन्ही शाळांच्या मान्यता रद्द करणे, (बोर्ड संलग्नतेसाठी ना हरकत प्रमाणपत्र) सीबीएसईचे संलग्नीकरण रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून, कारवाई संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देखील आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपसंचालक विभागातील शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.वाणी यांनी दिली.
अकरावीच्या ऑनलाईन तासिका सुरु, प्रवेशाची प्रतिक्षा कायम
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे यंदा मार्च महिन्यातच शाळांना परीक्षा न घेता सुट्या देण्यात आल्या होत्या. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी ऑनलाइन तासिका घेण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे अनेक ठिकाणी पालकांच्या नोकऱ्या गेल्या. शाळा बंद असल्याने काही शाळांचा मनमानी कारभार पाहून कोणतेही शुल्क वाढ करु नये. पालकांना शैक्षणिक शुल्क मागतांना दबाव आणू नये. टप्प्या-टप्प्याने शुल्क आकारावे असे आदेशच खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानंतरही अनेक शाळांकडून पालकांकडे शुल्कासाठी तगादा लावणे, मुलांचे ऑनलाइन तासिकेच्या लिंक बंद करण्याचे प्रकार समोर आले होते.
यात शहरातील शहानुरमियाँ दर्गा येथील जैन इंटनॅशनल स्कुल, युनिर्व्हसल स्कुल या शाळांमध्ये आरटीईचे नियम पाळले जात नाहीत. शुल्क वसुलीसाठी पालकांवर दबाव आणणे, शाळा बंद असतांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दबाव टाकणे, मुलांना ऑनलाइन ग्रुपमधून बाहेर केल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या. त्यावर शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने पाहणी केली असता आरटीईचे निमय पाळण्यात दोन्ही शाळांमध्ये अनियमित्ता असल्याचे समोर आले असून, या दोन्ही शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाला पाठविण्यात आला आहे, असेही श्री.वाणी यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर