esakal | मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप! राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना हॅट्ट्रीकची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

2bjp_p

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आकाराला आलेली महाविकास आघाडी पदवीधर निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप! राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना हॅट्ट्रीकची संधी

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आकाराला आलेली महाविकास आघाडी पदवीधर निवडणुकीत कायम राहण्याची शक्यता आहे. या आघाडीकडून बारा वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सतीष चव्हाण हेच संभाव्य उमेदवार राहतील हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. तर भाजपकडून शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, किशोर शितोळे या तिघांची नावे चर्चेत आहेत. आता भाजपकडून कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते? याकडे सर्वांचे लक्ष आहे. निवडणुका जाहिर झालेल्या असल्या तरी अद्यापही कोणत्याही पक्षाने उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे भाजपमध्ये मात्र उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

अकरावीच्या ऑनलाईन तासिका सुरु, प्रवेशाची प्रतिक्षा कायम

राष्ट्रवादीचे वर्चस्व
कधीकाळी भाजपचे वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ २००८ व २०१४ अशा सलग दोन निवडणुकीत राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतला आहे. दोनवेळा अपयश आल्यामुळे यावेळी हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही तयारी केली आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले शिरीष बोराळकर दुसऱ्यांदा इच्छुक आहेत. पण त्यांना प्रवीण घुगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांची स्पर्धा आहे.

भाजपच्या नेत्यांनी मतदार नोंदणी व मतदारसंघातील संपर्क वाढवण्यासाठी बोराळकर यांच्यावर नोंदणी प्रमुख तर घुगे यांच्यावर सहायक पदाची जबाबदारी सोपवत त्यांना कामाला लावले. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी मराठवाड्यात पसरलेल्या शैक्षणिक संस्थांच्या मदतीने भाजप उमेदवार बोराळकर यांच्यावर सहज विजय मिळवला होता. १९८४ पासून झालेल्या सात (पैकी एक पोटनिवडणूक) निवडणुकांमध्ये दोनवेळा काँग्रेसचे वसंत काळे, भाजपचे जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांनी तर राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांनी दोनदा विजय मिळवला आहे.

मजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च! शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात

चव्हाण यांना हॅट्ट्रीकची संधी
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नव्याने आकाराला आलेली महाविकास आघाडी सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. भाजपने ताकद लावली असली तरी त्यांचा तीन पक्षांसोबत थेट सामना होणार आहे. त्यामुळे सतीश चव्हाण हे हॅट्ट्रीक करणार का याकडे ही सगळ्यांचे लक्ष राहील. २००८ च्या पदवीधर निवडणुकीत राज्य पातळीवर शिवसेना- भाजप या पक्षांमधील मतभेदाचा फटका भाजपला बसला होता. शिवसेनेने ऐनवेळी राजू वैद्य यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे श्रीकांत जोशी यांचा पराभव झाला होता. पंधरा हजाराहून अधिक मते वैद्य यांनी मिळवली होती.

संपादन - गणेश पिटेकर