औरंगाबादेत कोरोनामुळे पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

औरंगाबादसह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. येथील एका पत्रकाराचा कोरोनामुळे सोमवारी (ता.१४) मृत्यू झाला. राहुल डोलारे (वय ४८, रा.संघर्ष) असे मृत पत्रकराचे नाव आहे.

औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. येथील एका पत्रकाराचा कोरोनामुळे सोमवारी (ता.१४) मृत्यू झाला. राहुल डोलारे (वय ४८, रा.संघर्ष) असे मृत पत्रकराचे नाव आहे. ते दैनिक सामनामध्ये बातमीदार होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचार सुरु होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा हे राहुल डोलारे यांचे मूळगाव.

त्यांचा आठवडाभरापूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. चिकलठाणा येथील कोविड केंद्रामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते. राहुल डोलारे यांना काही दिवस कृत्रिम श्‍वासोच्छवासवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. पण न्यूमोनिया बरा होत नव्हता. मात्र उपचार सुरु असतानाच आज सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई वडिल, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह, फेसबुकवर दिली माहिती

सर्वांनी काळजी घेण्याची गरज
दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. या काळात प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या सर्वांनी काळजी घेऊन वार्तांकन करण्याची गरज आहे. लोकांना वेगवेगळ्या घडामोडींविषयी माहिती देऊन त्यांना अद्ययावत ठेवण्याचे काम माध्यम प्रतिनिधी करत असतात, अशा काळात स्वतःची काळजी घेणे हेच हातात असते. काही त्रास झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला, तपासणी करणे गरजेचे आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Rahul Dolare Passed Away Due To Covid