esakal | 'हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गुन्हे मागे घ्या नाहीतर आंदोलन'
sakal

बोलून बातमी शोधा

jadhav harshvardhan

आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्यावरील केलेले सगळे आरोप खोटे असून त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

'हर्षवर्धन जाधव यांच्यावरील गुन्हे मागे घ्या नाहीतर आंदोलन'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

कन्नड: मागील काही दिवसांपासून कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या जेलमध्ये आहेत. जाधव यांच्या अनुपस्थिती मुलगा आदित्यने वडिलाच्या नावाने ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभे केले आहेत. यामुळे जाधव आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसत आहेत.

आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांच्यावरील केलेले सगळे आरोप खोटे असून त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. जाधव हे मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे एकमेव आमदार असून त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला आहे, ही माहिती निवेदनात दिली आहे. तसेच जाधव यांची तात्काळ कारागृहातून मुक्तता नाही केली तर समाजातील तरुण आंदोलन करतील असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे.

Corona Impact: अजिंठा लेणीत पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद; व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

तालुक्यातील त्रस्त असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय होत असल्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली असून नवख्या आदित्यने पत्रकारांच्या खोचक प्रश्नांनाही अतिशय समर्पक उत्तरे दिली. आदित्य जाधव यांनी ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत उडी घेऊन हर्षवर्धन जाधव सक्रिय होणार असल्याची घोषणा करून वडील अटकेत असताना स्वतः सर्व सूत्र हातात घेतले आहे. या निमित्ताने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे ही वाचा : 2021 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सत्तेत होणार मोठा बदल?

तालुक्यातील शेतकरी अनंत अडचणीत असून आणेवारी, पंचनामे, बंद पडलेली मका खरेदी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान यासह विविध समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांसाठी अधिक शांत बसू शकत नाही वडील हर्षवर्धन जाधव हे राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती लढवणार असल्याची घोषणाही आदित्य जाधवने यावेळी केली.

(edited by- pramod sarawale)