
औरंगाबाद : औरंगाबादेतील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणीचा बुधवारी ता.२४ मृत्यू झाला आहे. किडनी निकामी झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाघिणीचा कोरोना टेस्टसाठी लाळेचा नमूना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे. ही करिना वाघीण सहा वर्षाची होती.
महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय मराठवाड्याचे आकर्षण आहे. याठिकणी राज्यात सर्वाधिक १२ वाघ होते; मात्र फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात शक्ती-करिष्मा ही वाघांची जोडी पाठविण्यात आल्यामुळे दहा वाघ सध्या शिल्लक आहेत. यापैकी करिना नावाची सहा वर्षांची वाघीण आजारी आहे. ही बाब लक्षात येताच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांपासून तिने अन्न खाल्ले नाही. त्यामुळे तिला सलाईन लावण्यात आले होते.
दरम्यान, अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला करोनाची लागण झाल्याचे दोन महिन्यापूर्वी समोर आले होते, तेव्हापासून सेंट्रल झू ऑथरिटीने देशातील सगळ्या प्राणिसंग्रहालयांना दक्षतेचा इशारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेतील प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची नियमीत आरोग्य तपासणी केली जात होती. यापार्श्वभूमिवर या वाघिणीची कोरोनासाठी स्वॅब घेण्यात आला. डॉक्टरांनी पीपीई कीट परिधान करून लाळेचे नमुने घेतले. या नमुन्याचे अहवाल आज बुधवारी (ता. २४) सायंकाळ पर्यंत येतील असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आजाराचे कारण जाणून घेण्यासाठी रक्ताचे व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्राण्यांपासून मनुष्याला लागण होते का?
परदेशात कोरोना बाधित मनुष्याच्या संपर्कात आल्याने कुत्रा, मांजर आणि वाघ कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आले. पण, या बाधित प्राण्यांपासून त्यांच्या संपर्कात असलेला, त्यांची काळजी घेणारा कुणी मनुष्य बाधित झाल्याचे आढळले नाही, असे चंदीगडमधील शासतकीय वेटरनरी रुग्णालयाचे प्रमुख तथा प्रसिद्ध पशुचिकित्सक डॉ. अश्विनी कुमार यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे प्राण्याला कोवीड-१९ झाला तरी घाबरण्याचे कारण नाही.
यापूर्वी कुठे काय झाले?
हॉंगकॉंगमधील एका बाधित व्यक्तीच्या घरातील दोन पाळीव कुत्रे, बेल्जियममध्ये एक मांजर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्रान्क्स प्राणिसंग्रहालयामधील वाघाला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे वन्य प्राण्यांसह गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कुठल्याही प्राण्यांना कोरोना होऊ नये, यासाठी वनमंत्रालयाने प्राणिसंग्रालयाला सूचना आणि निर्देश दिले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची दखल घेत देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांना हाय अलर्ट जाहीर केला आहे. एवढेच नाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चिमणीलासुद्धा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा दावा पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.