उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

शहरातील एक गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही गर्भवती महिला उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान चौक परिसरातील असुन लातूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. 

उस्मानाबाद : शहरातील कोरोनाचे संकट टळल्यानंतर पुन्हा एकदा नवीन रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. शहरातील एक गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही गर्भवती महिला उस्मानाबाद शहरातील बोंबले हनुमान चौक परिसरातील असुन लातूर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. 

लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!   
 

उस्मानाबाद शहरातील रुग्णांची संख्या पन्नासच्या पुढे गेली आहे, मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाला असताना पुन्हा एकदा शहरावर कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. एक महिला गर्भवती असुन गेल्या काही दिवसामध्ये तिने शहरातील नामवंत तीन ते चार दवाखान्यात उपचारासाठी दाखविले होते. साहजिकच अशा दवाखान्याची नावे कळल्यावर तिथे गेलेल्या रुग्णासह वैद्यकीय स्टाफही चिंतेत असल्याचे दिसुन येत आहे.

औरंगांबादेतील बहीण-भावाच्या हत्याकांडामागे ओळखीचेच ?  

त्यातील दोन दवाखाने तर सुपरस्पेशालिटी असल्याचे सांगण्यात येत आहे. साहजिकच तिथे रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. शिवाय स्त्री रोग तज्ञ असलेल्या एका डॉक्टरांच्याही रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा काळामध्येच ती त्या दवाखान्यात जाऊन आल्याने आता चिंता वाढली आहे.

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध  

 तिच्या संपर्कातील लोकांची यादी काढण्याचे काम प्रशासनाने सूरु केले असले तरी सार्वजनिक ठिकाणी गेलेल्या लोकांची यादी जमविणे आता शक्य होणार नाही, त्या महिलेच्या माध्यमातुन समुह संपर्क झालेला नसावा अशी अपेक्षा आता व्यक्त होऊ लागली आहे. ही महिला स्वतः गर्भवती असुन ज्या भागात त्या राहतात, तो भागही सील करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

 

अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण 

९० जणांनी केली कोरोनावर मात 

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १३९ वर गेली असुन बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ९० वर पोहचली आहे. पण या नव्या रुग्णांच्या संपर्कातील आता किती लोकांची यादी निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in pregnant woman in Osmanabad