भाजपच्या भूलथापा आणि आश्‍वासनांना कंटाळून खडसे राष्ट्रवादीत आले, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मनोज साखरे
Thursday, 12 November 2020

भाजपच्या अशाच भूलथापा आणि आश्वासनांना कंटाळून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले. पुढील काही काळात आौरगाबादमधून देखील भाजपचे काही नेते, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार तीन महिन्यांत खाली खेचणार हे सांगितल्या शिवाय फडणवीसांचे सैन्य त्यांच्या सोबत थांबत नाही. आता वर्ष निघून गेले तरी त्यांना हे सरकार काही खाली खेचता आले नाही, अशीच पुढची चार वर्ष निघून जातील. पण सरकार कायम राहिल असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपच्या अशाच भूलथापा आणि आश्वासनांना कंटाळून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले. पुढील काही काळात आौरगाबादमधून देखील भाजपचे काही नेते, पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न आणि ते पूर्ण करू, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्‍वास

मराठवा़डा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता.१२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जंयत पाटील शहरात आले होते. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेले भांडण, किशोर शितोळे माझ्या जवळचे असूनही मी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासह फडणवीस यांच्यावरही टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, की जनता भाजपच्या भूलथापांना कंटाळली होती आणि म्हणून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला आणि शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे सरकारचे सगळे लक्ष त्यावर केंद्रीत झाले. आर्थिक संकटही उभे राहिले, तरी आम्ही थांबलो नाही. विकासकामांच्या गतीला काहीसा ब्रेक लागला असला तरी आता परिस्थिती सुधारत असल्याने त्यालाही वेग येईल.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

पण भाजपकडून सातत्याने सरकारवर टीका आणि ते खाली खेचण्याची भाषा केली जाते. देवेंद्र फडणवीस हे दर तीन महिन्यांनी हे सरकार खाली खेचणारच असे सांगत असतात, असे सांगितल्याशिवाय त्यांचे सैन्य सोबत थांबणार नाही, म्हणून त्यांना हे वारंवार सांगावे लागते. पण सरकार खंबीर आणि मजबूत आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला, वल्गना केल्या तरी सरकार पाचवर्ष कायम राहील. एक वर्ष सरले तशी पुढची चार वर्ष देखील सरतील आणि भाजपचे नेते सरकार खाली खेचणार हेच सांगत राहतील, असा टोला पाटील यांनी लगावला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadse Joined NCP Due To BJP's Falus Promise, Jayant Patil's Attack Of Fadanvis