बाळघुटी : प्रामाणिक प्रयत्न 

अनिल जमधडे
बुधवार, 8 जानेवारी 2020

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात महिलांची पारंपरिक गाणी, खेळ, मंगळागौर, डोहाळे जेवण आदी प्रसंगींचे विधी व खेळ, बारसे, लग्न आदींचे विधी व संबंधित गाणी, नवरात्रात शारदेची गाणी व खेळ इत्यादी सादर करणारे अनेक ग्रुप्स छोटीमोठी महिला मंडळे आहेत. "बाळघुटी' हे नाटक अशा ग्रुप्सतर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमांसारखेच आहे. 

पांढरपेशा कुटूंबाचा प्रवास 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात महिलांची पारंपरिक गाणी, खेळ, मंगळागौर, डोहाळे जेवण आदी प्रसंगींचे विधी व खेळ, बारसे, लग्न आदींचे विधी व संबंधित गाणी, नवरात्रात शारदेची गाणी व खेळ इत्यादी सादर करणारे अनेक ग्रुप्स छोटीमोठी महिला मंडळे आहेत. "बाळघुटी' हे नाटक अशा ग्रुप्सतर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमांसारखेच आहे. 

पांढरपेशा कुटूंबाचा प्रवास 

त्यात आधुनिकता आणि पारंपरिकता, वृद्धाश्रम, पाळणागृहे, सासूसुनेचे प्रेम रागाचे नाते, नोरी करणाऱ्या स्त्रीची ओढाताण असे काही वर्तमान विषय येतात हे खरे. पण त्याबाबतची फारशी चर्चा, वा चिंतन मंथनात्मक मांडणी न करता, आजच्या पांढरपेश्‍या शहरी कुटुंबाचा एकूण जीवनप्रवास एका सरळ रेषेत मांडलेला आहे. त्यात आचपेच, धक्केहादरे, नाट्य फारसे नसूनही सादरकर्त्यांची जी कुटुंबिय मंडळी आलेली असतात ती नाटक एन्जॉय करतात. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

कलाकारांचा उत्साह 

नाटकात अर्थातच कौतुकाचा भाव अधिक असतो हे उघड आहे. सादरकर्ती मंडळी नवखी (पण उत्साही) असल्याने त्यांच्या एंट्री-एक्‍झीटच्या चुका, प्रसंगाचा काळ वेळेच्या गफलती, कलावंतांनी प्रेक्षकांकडे अजिबात न पाहता, बुक्‍स न देता केलेला रंग मंचावरील वावर, इत्यादी इत्यादी अनेक बारीकसारीक चुकाही कुणी मनावर घेत नाही. 

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

महिला राज 

कामगार कल्याण नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत अशी टिपीकल बायको नाटके हमखास दरवर्षी किमान एकतरी असतेच. प्रस्तुत नाटकातील एक बापुडवाण्या चेहऱ्याने वावरणारे पुरुषपात्र सोडले तर बाकी सगळे महिला राज आहे. त्यांचा उत्साह, धडपड कौतुकास्पद आहे. त्यांना दाद देणाऱ्या कौटुंबिक रसिकांचा वर्गही मोठा आहे. या सर्वांतून आगामी काळात अधिक भरीव सृजनशील नाटक पुढे यावे ही अपेक्षा. कारण ही स्पर्धा आहे. आपल्या मंडळातला कॉलनीतला वा गणेशोत्सवातला कार्यक्रम नव्हे. सादरकर्त्या मंडळींचा उत्साह, त्यांचे परिश्रम याला सलाम आणि 
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

 

बाळघुटी. लेखिका : बागेश्री सराफ. दिग्दर्शक : अमिता लेकुरवाळे नेपथ्य : अर्चना काळे, प्रकाश : प्रशांत रहातेकर, संगीत : श्रीपाद पदे, रंगभूषा : तृप्ती सोनार, वेशबुषा ः स्नेहा लेकुरवाळे, रंगमंचव्यवस्था : रवी कुलकर्णी कलावंत : प्राची बासरकर, गौरी कुलकर्णी, सुनिता भाले, गायत्री कुलकर्णी, अशोक शिवणगी आणि अमिता लेकुरवाळे, सादरकर्ते : कामगार कल्याण उपकेंद्र मुकुंदवाडी, औरंगाबाद. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor welfare drama competition Aurangabad