एसटीची निर्भया परिक्रमा 

अनिल जमधडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी 

औरंगाबाद : एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, ही भूमिका घेऊन निघालेली निर्भया परिक्रमा शहरात दाखल झाली. ही आगळीवेगळी निर्भया परिक्रमा पाहताना अभिमान वाटतो, असे मत एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी व्यक्त केले. 

निर्भया परिक्रमा 

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे काढलेली निर्भया परिक्रमा औरंगाबाद विभागात दाखल झाली. त्यावेळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाऊ फाटक यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिक्रमेस सुरवात झाली. कार्यक्रमात श्री. मोटे यांनी भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत नर्मदा परिक्रमेबद्दल ऐकले होते, माहीत होते; पण प्रथमच निर्भया परिक्रमा एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यासाठीची भूमिका घेऊन विधायक कामासाठी बाहेर पडली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यावेळी विभागीय सचिव बाळासाहेब सोळुंके यांनीही मार्गदर्शन केले. औरंगाबाद येथे निर्भया संघटन बांधण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. परिक्रमेत सहभागी जळगावच्या शहादत तडवी व मनीषा ठाकरे यांनी गणवेशाचा लढा व जाचक परिपत्रके व नव्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची भूमिका स्पष्ट केली. एसटीच्या राज्यातील महिला कर्मचाऱ्यांनी निर्भया परिक्रमाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

सहभागी होण्याचे आवाहन 

या परिक्रमेतील महिला सदस्यांशी शीला संजय नाईकवाडे यांनी संवाद साधला व विलीनीकरणाच्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विभागीय अध्यक्ष सतीश जाधव, रवी डाखोरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मनीषा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमात विभागीय कार्यालयातील अरुणा चिद्री, नालंदा धीवर, साबेरा सिद्दीकी, मनीषा पाटील, संध्या वानखेडे, बबिता कोकणे, मनीषा कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. 

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

काय आहे मागणी 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या तुलनेत अत्यंत तोकडे वेतन मिळते. कमी वेतनावर काम करावे लागत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना कायम आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. त्यामुळेच एसटी कामगार संघटनेतर्फे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे अशी मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी तीन वर्षात तीन वेळा कर्मचाऱ्यांनी संप केला. मात्र प्रशासनाने एसटीचा संप मोडीत काढला. संप काळातील अनेक कर्मचाऱ्यांवर खटले दाखल केले आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या देशव्यापी संपात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor welfare drama competition Aurangabad