औरंगाबादच्या घाटीत ऑक्सिजन संपले, रुग्णांना द्यावे लागले सिलेंडरचा आधार

प्रकाश बनकर
Wednesday, 16 September 2020

घाटी रुग्णालयात बुधवारी(ता.१६) लिक्विड ऑक्सिजन संपल्याने ऐनवेळी सिंलेडर लावून रूग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहेत. अचानक संपलेल्या ऑक्सिजनमुळे घाटी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात बुधवारी(ता.१६) लिक्विड ऑक्सिजन संपल्याने ऐनवेळी सिंलेडर लावून रूग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहेत. अचानक संपलेल्या ऑक्सिजनमुळे घाटी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या प्रकरामुळे पुन्हा घाटी प्रशासनावर येणारा ताण आणि अपुरी यंत्रणेचे दर्शन सर्वांन घडले.

>शासकीय वैद्यकीय रूग्णालयात मेडिसनी विभागासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक आहे. यातून कोरोनान रूग्णांनी ऑक्सिजन देण्यात येते. सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्ण संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑक्सिजन सुविधआ सुरळीत राहील. यासाठी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतू लिक्विड ऑक्सिजन संपेपर्यत कोणीच याकडे लक्ष दिले नाही.

औरंगाबाद-पुणे महामार्गावर रास्ता रोको, कांदा निर्यात बंद केल्याने शेतकरी संतप्त

अचानक ऑक्सिजन संपल्यामुळे घाटी प्रशासनाने तात्काळ सिलेंडरव्दारे रुग्णांना ऑक्सिजन देण्यात येत आहे. यावेळ जंबो सिलेंडरही लावण्यात आले. ऑक्सिजन पुरवठा करणारे वाहन अन्य ठिकाऩी गेल्याने हा प्रकार घडल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.दरम्यान लिक्विड आॅक्सिजनचे वाहन एक ते दीड तासानंतर घाटीत दाखल झाले.
 

लिक्विड ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते, ते संपले नव्हते.
डॉ.कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी

 

महिलेने दिला तिळ्यांना जन्म, आईसह तिन्ही बाळ सुखरुप

 

औरंगाबादेत ४०६ कोरोनाबाधित

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता. १५) पुन्हा ४०६ कोरोनाबाधितांची भर पडली. अँटीजेन टेस्टमध्ये सिटी एंट्री पॉइंटवर ५५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १२७, ग्रामीण भागात ९३ रुग्ण आढळले. बरे झालेल्या २११ जणांना आज सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २९ हजार २०८ झाली. सध्या पाच हजार ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २२ हजार ४२२ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण
परिसर, कंसात रुग्णसंख्या ः नवीन कायगाव (१), शहापूर (१), वडगाव कोल्हाटी (१), रांजणगाव (१), बजाजनगर (१), सिडको महानगर (२), लोणी खुर्द, वैजापूर (१), खंडोबा मंदिराजवळ लांझी (१), नेहरूनगर, रांजणगाव (१), माळी गल्ली, रांजणगाव (१), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (२), शिवशंकर कॉलनी, रांजणगाव (१), कमलापूर फाटा, रांजणगाव (१), लीलासेन, रांजणगाव (१), न्यू वडगाव, गंगापूर (२), दहेगाव बंगला, गंगापूर (१), शिवाजीनगर, गंगापूर (३), लासूर, गंगापूर (१), मांजरी, गंगापूर (१), बोळेगाव, गंगापूर (२), पिंपळवाडी, गंगापूर (१), नवीन बसस्टँड, गंगापूर (४), जयसिंगनगर, गंगापूर (२), श्रीरामनगर, वडगाव को. (१), सिद्धिविनायक मंदिराजवळ, बजाजनगर (१), प्राथमिक आरोग्य केंद्र, निलजगाव (३), सरस्वती कॉलनी, कन्नड (१), म्हाडा कॉलनी, कन्नड (१), नेवरगाव, गंगापूर (२), चित्तेपिंपळगाव (१), साजापूर (१), चित्तेगाव (१) औरंगाबाद (२८), फुलंब्री (३), गंगापूर (२२), कन्नड (९), खुलताबाद (५), वैजापूर (१४), पैठण (१३).

शहरातील रुग्ण
श्री हाऊसिंग सो. (२), लक्ष्मी कॉलनी (१), मयूर पार्क (१), म्हाडा कॉलनी (१), मोती कारंजा (१), एन-अकरा सिडको (१), वेदांतनगर (३), सातारा परिसर (१), अन्य (६), गुरुदत्तनगर (१), बालाजीनगर (२), महेशनगर (१), गुलमोहर कॉलनी (१), मल्हार चौक, गारखेडा (१), देवळाई, बीड बायपास (२), एन-सात श्रेयनगर (१), भारतमाता कॉलनी (३), टाऊन सेंटर (१), श्रीकृष्णनगर (२) जाफरगेट (१), शिल्पनगरी, बीड बायपास (१), दिशानगरी, बीड बायपास (१), जाधवमंडी (१), एसबीएच कॉलनी (१), छावणी (२), उस्मानपुरा (१), एन-सहा साईनगर (२), गारखेडा परिसर (१), अदालत रोड, भाग्यनगर (१), ब्लू बेल, चिकलठाणा (१), देवगिरी कॉलनी, क्रांती चौक (१), पडेगाव (१), रामचंद्र हॉल, बीड बायपास (१), शंभुनगर चौक, कासलीवाल पूरम इमारत (२), सेव्हन हिल (१), रोज गार्डन (१), सिडको बसस्टँड (१), गजानननगर (२), कडा कॉलनी (१), विष्णुनगर (१), केतकी अपार्टमेंट, गारखेडा परिसर (१), मिलिटरी हॉस्पिटल (१), स्वामी विवेकानंदनगर, हडको (१), जटवाडा, हर्सूल (१), एन-चार सिडको (१), धूत हॉस्पिटल परिसर (१), म्हसोबानगर, हर्सूल (२), शिवाजीनगर (१), गजानन नगर, उस्मानपुरा (१), सुंदरवाडी (१), खिंवसरा पार्क, उल्कानगरी (१), एम-दोन टीव्ही सेंटर (१), कासलीवाल पूर्वा, चिकलठाणा (२), बीड बायपास (१), आरतीनगर (१), हनुमाननगर (१), समर्थनगर (१), शासकीय दंत महाविद्यालय परिसर (१), एन-आठ सिडको (२), उल्कानगरी (४), भानुदासनगर (१), भगवती कॉलनी, गारखेडा परिसर (१).

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquid Oxygen Supply Suddenly Over In Ghati Aurangabad News