मोजक्या उपस्थितीत औरंगाबादेत असा साजरा झाला महाराष्ट्र दिन

राजेभाऊ मोगल
Friday, 1 May 2020

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता.१) सकाळी आठ वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करून अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (ता.१) सकाळी आठ वाजता पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन करून अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे आदेश शासनाने दिलेले होते. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर, बँड पथक, सलामी पथकातील जवानांनी तोंडाला मास्क लावलेले होते.

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

ध्वजवंदनानंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदवले, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे बँड पथक आणि सलामी पथकात पाच पेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Din Flag Hosting In Aurangabad By Subhash Desai