esakal | मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरु ठेवलेत, अन हा पठ्ठ्या काय विकतोय पहा
sakal

बोलून बातमी शोधा

Court

चेलीपूरा भागात नशेच्या गोळ्यांची विक्री प्रकरणात पोलिसांनी कन्नड येथील एका मेडीकल चालकाला रविवारी (ता.२६) दुपारी गजाआड केले. रुपेश प्रदिप भारुका (३०, रा. समर्थनगर, ता. कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पाच हजार ३७० रुपये किंमतीची गुंगी आणणारी औषधीच्या ५३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरु ठेवलेत, अन हा पठ्ठ्या काय विकतोय पहा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : चेलीपूरा भागात नशेच्या गोळ्यांची विक्री प्रकरणात पोलिसांनी कन्नड येथील एका मेडीकल चालकाला रविवारी (ता.२६) दुपारी गजाआड केले. रुपेश प्रदिप भारुका (३०, रा. समर्थनगर, ता. कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पाच हजार ३७० रुपये किंमतीची गुंगी आणणारी औषधीच्या ५३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रकरणात यापूर्वी आरोपी शेख अतिकला पोलिसांनी अटक केली असून त्याला सोमवारपर्यंत (ता.२७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रकरणात औषधी निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज (५३) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, चेलीपुरा भागात नशेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याची माहितीवरुन पोलिसांसह औषधी प्रशासनाने छापा मारुन शेख अतिकला अटक केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याच्या घरझडतीत चार हजार ७७६ रुपये किंमतीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपीला शेख अतिक याने पोलिस कोठडी दरम्यान नशेच्या गोळ्या कन्नड येथील रुपेश भारुका याच्या न्यु श्री मेडीकलमधून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रुपेश भारुका याला अटक केली. गुंगी आणणाऱ्या औषधांबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने पावती नसल्याचे सांगितले तसेच जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांवरील बॅच व एमआरपी देखील खाडाखोड केलेली दिसली.

मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी 
आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (ता. २८) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी दिले. आरोपीने मेडीकल मधील गुंगी आणणारी औषधी कोणाकडून आणली याचा तपास करणे असून गुन्ह्याच्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा