राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते; ते ज्याचे त्याला घडवावे लागते, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंचा सल्ला

मधुकर कांबळे
Sunday, 1 November 2020

राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्याला घडवावे लागते असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला.

औरंगाबाद : राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्याला घडवावे लागते असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रविवारी (ता.एक) नियुक्तिपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कांद्याच्या रोपांना रोगांची लागण; बियाणांचा दर वाढतोय, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे व आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे नियुक्तिपत्र देण्यात आले. कोरोनाच्या प्रभावामुळे भाजयुमोच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे न देता केवळ मंचावर उभे करून छायाचित्र काढण्यात आले. यावेळी श्री.दानवे म्हणाले, की राजकारणात कोणालाही भविष्य नसते मात्र ते घडवता येते. राजकारणात ज्याचे त्याला भविष्य घडवावे लागते असा सल्ला देतानाच उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना खाली बसवत म्हणाले, ८० टक्के पदाधिकारी मोबाईलमध्ये खेळतात.

हे धरून आणलेले कार्यकर्ते आहे का असे म्हणताच सभागृहात हसू फुटले. शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर म्हणाले , देशातील भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये युवा मोर्चाचा पदाधिकारी मुख्यमंत्री होऊ शकतो. शहर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो. तेव्हा तुम्ही देखील भविष्यात मोठे पदाधिकारी होऊ शकतात. यासाठी पक्षात सक्रिय राहणे महत्त्वाचे आहे. कामात सक्रिय राहिल्यानेच आज विजया रहाटकर, केंद्रीय पातळीवर पदाधिकारी झाल्या. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असा उल्लेख केला.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

यावेळी भाजपचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, शहर अध्यक्ष संजय केणेकर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष राजगौरव वानखेडे, ग्रामीण युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरज लोळगे, समीर राजुरकर, राजू शिंदे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, राजेश मेहता, प्रवीण घुगे, मनोज भारसकर, ईद्रिस मुलतानी, कचरू घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No One Future In Politics, But They Will Do, Raosaheb Danve's Advise