esakal | एमपीएससीची याचिका परत घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मराठा मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Kranti Morcha News

३० नोव्हेंबर २०१८ पासून एसईबीसीच्या आरक्षणानुसार नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सगळ्याच उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रद्द करावीत, अशी मागणी एमपीएससीच्या वतीने करण्यात आली आहे.

एमपीएससीची याचिका परत घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मराठा मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : एमपीएससीच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय करणारी याचिकेस जबाबदार व्यक्ती व दोषींवर कारवाई करावाई करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (ता.२५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विभागीय आयुक्तांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  निवेदनात म्हटले की, एमपीएससीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ३० नोव्हेंबर २०१८ पासून एसईबीसीच्या आरक्षणानुसार नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सगळ्याच उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रद्द करावीत, अशी मागणी एमपीएससीच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

एमपीएससीतर्फे अशी याचिकाच न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे याची माहित राज्य सरकारलाच नसल्याची बाब मराठा आरक्षण हस्तक्षेप याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी समोर आणली आहे. एमपीएससीने दाखल केलेली ती याचिका तात्काळ परत घेण्यासाठी शासन निर्णय होणे जनहितार्थ अत्यावश्यक असल्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासह दोषींवर तात्काळ कारवाई अन्यथा मराठा क्रांती मोर्चा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राजेंद्र दाते पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण, मनोज गायके, रेखा वहाटुळे, रविंद्र तांगडे, चंद्रशेखर निकम, रवींद्र वहाटूळे, लक्ष्मणराव चव्हाण आदी उपस्थित होते. 
 

Edited - Ganesh Pitekar