esakal | Corona Updates: मराठवाड्यात कोरोनाचे सहा हजार ६५६ रुग्णांची भर, सात जिल्ह्यांत ८३ जणांचा मृत्यू 

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी १९६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७४१२ झाली. दरम्यान, दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. 

Corona Updates: मराठवाड्यात कोरोनाचे सहा हजार ६५६ रुग्णांची भर, सात जिल्ह्यांत ८३ जणांचा मृत्यू 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शनिवारी सहा हजार ६५६ जणांच्या कोविड-१९ चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, ८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी १९६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९७४१२ झाली. दरम्यान, दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला.  नांदेड जिल्ह्यात एक हजार ७५९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच २७ रुग्णांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात नवीन १११ रुग्ण आढळून आले. दिवसभरात ३०१ रुग्णांना सुटी देण्यात आली. परभणी जिल्ह्यात ६८४ कोरोनाबाधित आढळले.

"आम्ही यापुढे लॉकडाउनचे अनुसरण करणार नाही ! बस म्हणजे बस !!' 

दिवसभरात १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर दिवसभरात ३७९ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जालना जिल्ह्यात शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर कोरोनाचे ६५२ नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. दरम्यान ५९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३१ हजार ८५५ कोरोनाबाधितांपैकी २५ हजार २०८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात तब्बल सहा हजार ८५ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला तर एक हजार ४८६ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात ७६७ रुग्णांची भर पडली तर आठ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ५५८ नवीन रुग्ण आढळले तर ७ जणांचा मृत्यू झाला.