esakal | हा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं
sakal

बोलून बातमी शोधा

हा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं

इम्तियाज जलील म्हणाले की, संपुर्ण देशात लाखोंच्या संख्येचे मजुर अकडल्याची माहिती केंद्र, राज्य होती. एकट्या औरंगाबादेत हजारोंच्या संख्येने मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल मधील मजुर दीड महिन्यांपासून आपल्या घरी कुणीतरी पोहचवेल याच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र याकडे लक्ष दिले गेले नाही.

हा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः करमाड जवळ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. लोकांच्या नजरेत यामध्ये १६ गरीब, बेघर मजुर मारले गेले. मात्र मी याला अपघात नव्हे तर हत्या म्हणेल असा आरोप खासदार इम्जियाज जलील यांनी केला आहे. 

इम्तियाज जलील म्हणाले की, संपुर्ण देशात लाखोंच्या संख्येचे मजुर अकडल्याची माहिती केंद्र, राज्य होती. एकट्या औरंगाबादेत हजारोंच्या संख्येने मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल मधील मजुर दीड महिन्यांपासून आपल्या घरी कुणीतरी पोहचवेल याच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही वारंवार सरकारकडे मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र याकडे लक्ष दिले गेले नाही.

लॉकडाऊन असल्याने मजुरांना पोलिसांची भीती असून ते चोर मार्गाने आपल्या गावाकडे जात आहे. हे मजुर सुद्धा असेच रेल्वे पटरीच्या मार्गाने निघाले होते. कित्येक केसेस मध्ये लोक अंतर्गत रस्त्यांवरुन जात आपले गाव गाठत आहे. ही आरोप करण्याची वेळ नाही मात्र शेकडो मजुर त्यांच्या गावाकडे पायी निघाले हे कुणी ही नाकारु शकत नाही. एक ते दीड हजार किलोमीटरचा प्रवास ते पायी करत आहे.

संबंधित बातमी - शरीराचे तुकडे जुळवतांना गहिवरले मन

ज्या पद्धतीने परदेशातून विमानाने भारतीयांना आणले जात आहे. असेच नियोजन कामगारांसाठी भारतीय रेल्वेकडून का करण्यात आले नाही ? विविध शहरात आपले पोट भरण्यासाठी मजुर आले होते. मात्र आता त्यांना या संकटाच्या काळात आपल्या गावाकडे जायचे आहे. करमाडच्या रेल्वे घटनेला सरकारच जबाबदार आहे. रेल्वे म्हणेल आम्ही चौकशी करतो. त्यांना भरपाई मिळेल. मात्र गरीबांचा जीव एवढा स्वस्त आहे हे सरकारमधील बसलेल्या लोकांनी समजून घ्यावे. 

इम्तियाज जलील म्हणाले की, मी वैयक्तिकरित्या पीएमओ, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला ट्विट केले होते. यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड मधील मजुर सायकलद्वारे गावी जात आहे. त्यांचे अनेक व्हीडीओ समोर आले. अजूनही औरंगाबादमध्ये हजारो प्रवासी अडकले आहेत. विशेष गाड्यांची व्यवस्था करुन त्यांना लवकरात लवकर आपापल्या राज्यात पाठवावे.