यांना मिळाली क्लासेसची परवानगी पण कोरोना टेस्ट बंधनकारक

शेखलाल शेख
Thursday, 3 September 2020

विद्यार्थ्यांना क्लासमध्ये येण्यापुर्वी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. एमकेसीएलची केंद्रे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु ठेवता येणार आहे

 

औरंगाबादः जिल्ह्यात शासनमान्य संगणक टायपिंग, टंकलेख्न, लघुलेखन संस्था तसेच जिल्ह्यातील सर्व शासन मान्य महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) च्या संस्था-केंद्र सुरु करण्यात परवानी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवार (ता.३) रोजी याचे आदेश काढले. विद्यार्थ्यांना क्लासमध्ये येण्यापुर्वी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. एमकेसीएलची केंद्रे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु ठेवता येणार आहे. 
 

 • संगणक टायपिंग, टंकलेखन, लघुलेखनसाठी अशा आहेत नियम व अटी 
 •  
 •  प्रत्येक संगणक-टंकलेखन यंत्रात किमान ६ चौरस फुटाच्या प्रमाणात सोय करावी लागणार 
 • प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लासला येण्यापुर्वी त्याने ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. 
 • संस्थेत प्रवेश घेणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना आरोग्य सेतु ॲप डॉऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. 
 •  कंटेन्टमेंट झोन मधील व्यक्तींना प्रवेशामधून वगळावे लागणार आहे तसेच जिल्ह्यातील कंटेन्मेट झोन मध्ये येण्या-जाण्यास सक्त मनाई राहणार आहे. 
 •  दोन बॅच मध्ये अर्धा तास अंदार ठेवुन सॅनीटायजेशन बंधनकारक राहणार आहे 
 •  विद्यार्थ्यांना हात धुण्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागेल 
 •  कोविड लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही 
 • शासन निर्धारित फिस पेक्षा जास्त फिस घेता येणार नाही 
 •  उमेदवारांना हॅण्डग्लोज, मास्क बंधनकारक राहणार 
 • प्रत्येक विषयासाठी संगणक, टंकलेखन, लघुलेखन स्वतंत्र बैठक ठेवावी लागणार 
 •  जानेवारी २०२० ते जून २०२० या सत्रातील विद्यार्थ्यांचे राहिलेले तास पुर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे लागणार 
 • एमकेसीएलच्या केंद्रासाठी अशा आहेत नियम, अटी 

  • हॉलमध्ये प्रत्येक संगणकात किमान ६ चौरस फुट या प्रमाणात जागेची सोय करावी लागणार 
  •  प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लासला येण्यापुर्वी त्याने ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. 
  •  आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणे आवश्‍यक राहणार आहे. 
  • जिल्ह्यातील सर्व शासनमान्य (एमकेसीएल) केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसिलदारांकडे सादर करावी लागणार 
  •  विद्यार्थ्यांची दररोज नोंदवही तयार करावी लागणार 
  •  जिल्ह्यातील केंद्रे सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या दिवशी सुरु राहणार आहे 
  •  हॉल मध्ये एक वेळेस ५ उमेदवार तसेच १ अध्यापकाशिवाय इतरांना प्रवेश देऊ नये 
  •  प्रत्येक विषयासाठी एमकेसीएल केंद्रात स्वतंत्र बैठक ठेवावी लागणार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mkcl Typing Center Permission In Aurangabad