MPSC Exam: कोरोनामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

शेखलाल शेख
Thursday, 8 April 2021

रोनाचा कहर सुरू असल्याने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवी कडक नियमावली लागू केली आहे

औरंगाबाद: MPSC Exam :कोरोनाचा कहर सुरू असल्याने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवी कडक नियमावली लागू केली आहे. सध्या एमपीएससी तयारी करणाऱ्या, परीक्षा देणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. लॉकडाऊनमुळे एमपीएससीचे राज्यभरातील सर्व क्लासेस, अभ्यासिका बंद आहेत. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना मेस बंद असल्याने गैरसोय झाली आहे. या शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे. अशा परिस्थितीत ११ एप्रिलरोजी घेण्यात येणारी परिक्षा शक्य नाही.

Corona Vaccination: औरंगाबाद शहरातील दीड लाख नागरिकांना लसीकरण

कोरोना झाल्यामुळे तसेच लॉकडाऊन सदृश्‍य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना या परिक्षेला मुकावे लागेल. त्यामुळे त्यांचे शैक्षिणक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलावी. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे. 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC Exam MP Imtiaz Jaleel demands postponement of MPSC exam due to corona