esakal | कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढवा; नियम न पाळणाऱ्यांवर महापालिका करणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

कोरोना संसर्ग रोखणे, तसेच लसीकरणाबाबतची आढावा बैठक सोमवारी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढवा; नियम न पाळणाऱ्यांवर महापालिका करणार कारवाई

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लग्न समारंभासाठी होणारी गर्दी रोखावी लागेल. ५० जणांची मर्यादा मंगल कार्यालयांना ठरवून दिली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना १० हजार रुपयांचा दंड लावण्यात यावा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचण्या वाढवा, अशा सूचना सोमवारी (ता. २२) महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

वाचा - कोरोना काळात औरंगाबादचे राजकारणी इतके बेफिकीर कसे? ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; नियम काय जनतेनेच पाळायचे का ?


कोरोना संसर्ग रोखणे, तसेच लसीकरणाबाबतची आढावा बैठक सोमवारी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह वॉर्ड अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. नेमाने यांनी सांगितले की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, जास्तीत जास्त आरटीपीसीआर कोरोना चाचण्या करणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना नेमाने यांनी केल्या.

वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच

डॉ. नीता पाडळकर यांनी लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात यावा. मंगलकार्यालय, लॉन्स, हॉटेल्स, सिनेमा हॉल, धार्मिक कार्यक्रमांची ठिकाणे, उद्याने, मॉल्स, रेस्टॉरंट याठिकाणी मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर न करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Edited - Ganesh Pitekar