
नाजीम सय्यद यांना गेवराई मर्दा शिवारात वडिलोपार्जित एक हेक्टर शेती असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच असून ते आतापर्यंत पारंपारिक पध्दतीनेच शेती करीत होते. माञ इतर पिके घेतल्यास मशागतीचा ही खर्च निघत नसल्याने पाच वर्षापूर्वी त्यांनी फळ व भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला.
आडुळ (औरंगाबाद) : शेतात निघणारा भाजीपाला, फळांची ठोक विक्री न करता त्याची दुचाकीवरुन गावोगावी किरकोळ विक्री करुन कमी क्षेञात जास्तीचे उत्पन्न घेतल्याची किमया गेवराई मर्दा (ता.पैठण) येथील अल्पभुधारक व अल्पशिक्षित तरुण शेतकरी नाजीम सय्यद याने करुन दाखविली आहे.
नाजीम सय्यद यांना गेवराई मर्दा शिवारात वडिलोपार्जित एक हेक्टर शेती असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच असून ते आतापर्यंत पारंपारिक पध्दतीनेच शेती करीत होते. माञ इतर पिके घेतल्यास मशागतीचा ही खर्च निघत नसल्याने पाच वर्षापूर्वी त्यांनी फळ व भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भेंडी, टमाटे, वांगे, मिर्ची, पपई सह इतर पिके घेण्यास सुरुवात केली. गेवराई मर्दा हे गाव खेडे गाव असल्याने गावात तर याची विक्री होणार नाही. त्यामुळे त्यांना ठोक विक्री किंवा मोठ्या बाजारपेठेत नेल्याशिवाय पर्याय नव्हता. माञ त्यांनी यावर उक्ती शोधत शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांच्या दारी नेऊन विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आडत तर वाचलीच माञ मालाला ही चांगला भाव मिळत असल्याने ते आज घडीला कमी क्षेञात जास्त उत्पन्न घेत आहेत.
औरंगाबादच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दररोज एका दिवसात जेवढा माल विक्री होईल, तेवढाच माल तोडून ते आडुळ, औरंगाबाद, पैठण, पाचोड येथे घरोघरी दुचाकीवर फिरुन विक्री करतात. यासाठी त्यांचे वडिल बुर्हाण सय्यद, आई नगिनाबी सय्यद व पत्नी शबाना सय्यद हे मदत करतात. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर पारंपरिक शेतीला फाटा देत पपई, पालेभाज्याची शेती करुन भरघोस उत्पन्न मिळविल्याची किमया करुन दाखविली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या शेतकऱ्याने कोणतेही पिक घेतले तरी त्याला लागवड, मशागत व खते याचा खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे तरुण पिढीने शेती व्यवसायाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र सध्या गावोगावी पहावयास मिळते. मात्र याला अपवाद ठरला गेवराई मर्दा येथील ३० वर्षीय शेतकरी नाजीम सय्यद.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
यंदा त्याने भेंडीची १५ गुंठे क्षेञात लागवड केली होती. त्याला मशागत, फवारणी व इतर असा एकूण १५ हजार रुपये खर्च आला होता तर याचे ७५ हजार रुपये झाले. तर १५ गुंठे क्षेत्रात टमाटे लागवड केली होती. यात खर्च वजा २५ ते ३० हजाराचे उत्पन्न मिळाले. नऊ महिन्यांपूर्वी पपईची लागवड केली होती. आता पर्यंत पाच टन माल विक्री झाले आहे. यातून ७५ हजाराचे उत्पन्न मिळाले आणखीन सात टन पपई निघेल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी ३०० मोसंबीची झाडे लावली असून यात हे अंतर पिक म्हणून उत्पन्न घेतले आहे.