औरंगाबादेतील ४८ केंद्रांवर होणार नीट परीक्षा, बारा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ

संदीप लांडगे
Thursday, 10 September 2020

नीटची परीक्षा पुढे ढकलण्यास तसेच रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नियोजित वेळेत म्हणजे रविवारी (ता.१३) ही परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औरंगाबादमधील ४८ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून यासाठी १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झाले असल्याचे परीक्षा समन्वयक रविंदर राणा यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद : नीटची परीक्षा पुढे ढकलण्यास तसेच रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नियोजित वेळेत म्हणजे रविवारी (ता.१३) ही परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औरंगाबादमधील ४८ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून यासाठी १२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी प्रविष्ठ झाले असल्याचे परीक्षा समन्वयक रविंदर राणा यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेला देशभरातून सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आतापर्यंत मे,जून, जुलै असे तीनवेळा बदलण्यात आले. मागील चार महिन्यांपासून सर्व विद्यार्थी, पालकांचे लक्ष या परीक्षेकडे लागले होते.

लातूर पॅटर्न राज्यात भारी, पण लातुरकरांना का हवे स्वातंत्र विद्यापीठ?

मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर १३ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदा फिजिकल डिस्टिन्सिंगचे नियमाचे पालन व्हावे, म्हणून परीक्षा केंद्रात वाढ करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रावर खबरदारीचे उपाय म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची व केंद्रांची वाढलेली संख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोचता यावे, त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्याला पुन्हा संधी
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने नीटच्या परीक्षेला नोंदणी केली आहे. पंरतू, तो कोरोना संक्रमित असेल अशा विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही. पण त्यांनी एनटीएला अर्ज करुन कळविल्यास त्यांना पुढे परीक्षा देण्याची संधी मिळेल.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे हे नियोजन
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षेसंदर्भात उपाययोजना केल्या आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निश्‍चित वेळ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे. एका वेळी १५ विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मास्क व हातमोजे नसतील अशा विद्यार्थ्यांना केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे. एका वर्गात किमान बारा विद्यार्थ्यांची आसनाची व्यवस्था असेल.

वादळी वाऱ्याने ऊस झाला भुईसपाट, पाऊस मात्र कमीच

औरंगाबादमध्ये ४८ केंद्रांवर बारा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘एनटीए’ तर्फे नियमावली निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा केंद्र सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांची आसन व्यवस्थेबाबत खबरदारी घेतली आहे. कोरोना असलेल्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. याबाबत केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- रविंदर राणा (परीक्षा समन्वयक, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल)

 

परीक्षा केंद्रातील नियोजन
- परीक्षेच्या आगोदर व नंतर केंद्राला करणार सॅ
निटाइज
- प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क, सॅनेटायझर, हॅण्डग्लोज आवश्‍यक
- विद्यार्थ्यांचे थर्मलगनने तापमान तपासूनच परीक्षा कक्षात प्रवेश
- विद्यार्थ्यांचे तापमान अधिक असेल तर पुन्हा तपासणी करुन प्रवेश
- प्रत्येक केंद्रावर आयसोलेशन रुमची व्यवस्था
- पीपीई कीट परिधान करुन पर्यवेक्षक असतील

संपादन- गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neet Entrance Will Conduct At 48 Examination Centre Aurangabad News