esakal | औरंगाबादेत झाली ‘नीट’ परीक्षा, अठ्ठेचाळीस केंद्रांवर २० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

Neet Exam Aurangabad

सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर रविवारी (ता. तेरा) देशभर ‘नीट’ची परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ केंद्रांवर घेतलेल्या या परीक्षेसाठी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

औरंगाबादेत झाली ‘नीट’ परीक्षा, अठ्ठेचाळीस केंद्रांवर २० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद :  सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर रविवारी (ता. तेरा) देशभर ‘नीट’ची परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ केंद्रांवर घेतलेल्या या परीक्षेसाठी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; मात्र कोरोनामुळे १० टक्के विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित असल्याचे परीक्षा समन्वयकांनी सांगितले.

मराठवाड्यातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे अस्तित्वच धोक्यात, परवाना...

राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेला देशभरातून सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागील चार महिन्यांपासून सर्व विद्यार्थी, पालकांचे लक्ष या परीक्षेकडे लागले होते. औरंगाबादेतील ४८ केंद्रांवर नीटची परीक्षा पार पडली. यासाठी औरंगाबादसह जालना, बीड या जिल्ह्यांतील विद्यार्थीही परीक्षेसाठी औरंगाबादेत हजर झाले होते. केंद्रावर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियमाचे पालन व्हावे, म्हणून परीक्षा केंद्र वाढवण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर खबरदारीचे उपाय म्हणून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांना पुन्हा संधी
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने नोंदणी केलेले अनेक विद्यार्थी परीक्षेच्या काळात कोरोना संक्रमित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यानी ‘नीट’च्या परीक्षेला नोंदणी केली होती; परंतु कोरोना संक्रमित असल्यामुळे त्याला परीक्षेपासून वंचित राहावे लागले, अशा विद्यार्थ्यांनी एनटीएला अर्ज करून कोरोना संक्रमणाबाबत माहिती दिल्यास, त्यांना पुढे परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याचे परीक्षा समन्वयक रविंदर राणा यांनी सांगितले.

जायकवाड धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदापात्रात २५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग...

प्रत्येक केंद्रावर नियोजन
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निश्‍चित वेळ देण्यात आल्याने वेळेत विद्यार्थी उपस्थित राहिले होते. एका वेळी १५ विद्यार्थ्यांनाच केंद्रात प्रवेश दिला जात होता. ज्या विद्यार्थ्यांकडे मास्क व हातमोजे नसतील अशा विद्यार्थ्यांना केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसाठी पीपीई किट घातल्यानंतरच केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येत होता. एका वर्गात फक्त बारा विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था होती; तसेच एनटीएकडून सर्व विद्यार्थ्यांना मास्क पाठवण्यात आले होते.

संपादन - गणेश पिटेकर