
औरंगाबाद शहरात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक होते. यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे.
औरंगाबाद : शहरात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बटाट्याची आवक होते. यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. तेथे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने शहरात बटाट्याचे दर १० ते १५ रुपये किलो राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. सध्या शहरात बटाटे ५० रुपये किलोने विक्री होत आहेत. नवीन आवक बाजारात विक्रीसाठी येऊ लागली आहे. यामुळे दरात चढ-उतार होत आहे. अशीच आवक होत राहिल्यास दर १५ रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
औरंगाबादच्या नामांतरावर अजित पवार बोलले...
उत्तर प्रदेशात सध्या ५० रुपयांत तीन किलो बटाटे मिळत आहेत. गेल्या वर्षी २० लाख हेक्टरवर बटाट्याची लागवड करण्यात आली होती. यंदा वातावरण चांगले असल्यामुळे १६० लाख मेट्रिक टन बटाट्याचे उत्पादन होण्याची शक्याता वर्तवली जात आहे. या बंपर उत्पादनामुळे बटाट्याच्या किमतीत मात्र मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे.
लग्नाची हळद फिटण्यापूर्वीच एकुलत्या एक मुलावर काळाचा घाला, ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू
बाजार समितीत बटाट्याची आवक
बाजार समितीत नियमित सरासरी १९९ ते ४०० क्विंटल बटाट्याची आवक होते. राज्यातील काही जिल्ह्यांसह मध्य प्रदेश व उत्तरप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर बटाटा येतो. दोन डिसेंबर २०२० ते दोन जानेवारीपर्यंत बाजार समितीत केवळ पाच हजार ७६६ क्विंटल बटाट्याची आवक आहे. म्हणूनच शहरात विक्री होणारा बटाट्याचे दर हे पन्नासीपार गेले. सध्या नवीन बटाट्याची आवक सरू झाली आहेत. दोन डिसेंबरला बाजार समितीत १९९ तर दोन जानेवारीला ३०० क्विंटल आवक झाली. येत्या महिनाभरात नवीन बटाटा बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. २९ डिसेंबरला सर्वाधिक ४५३ क्विंटल बटाट्याची आवक झाली. यास दरही औरंगाबादच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल बाजार समितीत क्विंटलमागे एक हजार १५० रुपयांचा मिळत आहे. उत्तर प्रदेशातील बटाटा अजून आपल्याकडे दाखल झालेला नाही. तो आल्यानंतर दर आणखी उतरतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. सध्या फुलंब्री, सिल्लोडसह मध्य प्रदेशातून आवक सुरू झाली आहे. बाजारात सध्या ५० टन आवक होत आहे. उत्तर प्रदेशातील बटाटा आल्यास शहरात दर १० ते १२ रुपये किलोने विक्री होतील.
- इब्राहिम खान, विक्रेते
संपादन - गणेश पिटेकर