एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द : पाच दिवसांत बुडाले २७ लाखांचे उत्पन्न 

अनिल जमधडे
शनिवार, 21 मार्च 2020

औरंगाबाद : कोरोना विषाणूंचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये साठी सर्वच विभागाकडून खबरदारीच्या उपाय योजना केल्या जात आहेत. एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. 

औरंगाबाद : कोरोना विषाणूंचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये साठी सर्वच विभागाकडून खबरदारीच्या उपाय योजना केल्या जात आहेत. एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मार्गावरील बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. 

सहा मार्चला औरंगाबाद शहरात पहिला संशयित रूग्ण आढळून आल्यानंतर सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. शासकीयस्तरावर खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागातील विविध मार्गावर धावणाऱ्या अनेक बस प्रवाशांअभावी रद्द कराव्या लागल्या. सर्वाधिक उत्पन्न देणारी शहरे पुणे, मुंबई, नाशिक या मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सिडकोच्या ४८ फेऱ्या रद्द 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत. त्याच बरोबर एसटी महांमडळात ही खबरदारी म्हणून बस पाण्याने स्वच्छ धुवूनच प्लॅटफार्मवर लावल्या जात आहेत. मध्यवर्ती बसस्थानकासह विभागातील आठही आगाराच्या मार्गावर प्रवासी संख्या घटल्यामुळे अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रवासी नसल्यामुळे सिडको बसस्थानकातून सुटणाऱ्या लातूर, बीड, पुणे, अकोला, सोलापूर, सुरत या मार्गावरील ४८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई-पुणे सेवा पूर्णपणे बंद 

विशेषत: सिडको बसस्थानकातूनन मुंबई-पुणे या मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सिडको बसस्थनाकाला दरदिवशी मिळणारे जवळपास चार लाखाचे उत्पन्न बुडत आहे. त्याच बरोबर मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, नाशिक या मार्गावरील प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे सर्वच मार्गावरील बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. 
 

  • बुडालेले उत्पन्न याप्रमाणे 
  • - १५ मार्च : ३६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ३४६५ किलोमीटर रद्द झाल्याने सव्वा लाखाचे नुकसान झाले. 
  • -१६ मार्च : ११४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने एक हजार किलोमीटर प्रवास रद्द झाल्याने ३ लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. 
  • -१७ मार्च : १६० फेऱ्या रद्द झाल्याने १७ हजार ११० किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. परिणामी, ५ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले 
  • १८ मार्च : ३१४ फेऱ्या रद्द केल्याने ३९ हजार ९२५ किलोमीटर रद्द केल्याने ९ लाख ७० हजार रुपयांचा फटका बसला. 
  • -एकूण : पाच दिवसांत १,१२६ फेऱ्या रद्द झाल्याने ९९ हजार ११० किलोमीटर रद्द झाल्याने २७ लाख २२ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Bus Aurangabad