No Corona In N 1, N 4 Area At Aurangabad
No Corona In N 1, N 4 Area At Aurangabad

Coronavirus : औंरगाबादमध्ये या वसाहतींनी कोरोनाला रोखले, वाचा कसे...

औरंगाबाद ः  शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सोळा दिवसांतील वेग प्रतिदिन ३७.५ रुग्ण एवढा आहे. डबलिंग रेट साडेचार ते पाच टक्के आहे. अशा स्थितीत सर्वांत आधी कोरोनाचे रुग्ण आढळूनही शहरातील सिडको एन-१ व एन-४ या भागांत कोरोनाचा फैलाव झाला नाही. शहरातील अशा अनेक भागांतही बहुधा फैलाव नाहीच अथवा काही ठिकाणी कमीच आहे. याची कारणे काय? तर सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाइन होण्याची, बदलांना स्वीकारण्याची तयारी, नातेसंबंधांना आवर, तुरळक संपर्क, विरळ वसाहती ही होत. 

पहिला रुग्ण एन-१ या भागात १५ मार्चला व दुसरा रुग्ण सिडको एन- ४ येथे दोन एप्रिलला आढळले. त्यानंतर आजपर्यंत ६५३ रुग्ण (सायंकाळी सातपर्यंतची आकडेवारी) झाले; पण त्यानंतर एन-१ मध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. एन- चारमधील रुग्णाच्या संपर्कातील त्यांची नात व चालक वगळता नंतर या भागात संसर्ग वाढला नाही. या भागात नागरिकांनी स्वतःला सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवले. कॉन्टॅक्ट होणार नाही, याची दक्षताही घेतली. अगदी घरातही त्यांनी कुटुंबीयांपासून स्वतःला वेगळे ठेवले आहे. अशी अनेक कारणेही फैलाव न होण्यास पूरक ठरली आहेत. 

  • दाट लोकवस्ती नाही 
  • जास्त जागृती, शिक्षणाचाही परिणाम 
  • घरांची रचना, विरळ परिसर 
  • अशा भागात नेहमीच लॉकडाउनसारखी स्थिती 
  • नातेसंबंधापेक्षाही आरोग्याला प्राधान्य 
  • कामावेळी व आवश्‍यक तेव्हाच तुरळक संपर्क 
  • स्वतःला पूर्ण सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाइन ठेवण्याची तयारी 

 
शहराची दुसरी बाजू अशी 

  • दाट लोकवस्ती 
  • नको त्या लोकांत वावर 
  • आयसोलेशन, क्वारंटाइनची असमर्थता 
  • लॉकडाउनचे तंतोतंत पालन नाही 
  • हातावर पोट असल्याने रोज बाहेर जावेच लागते 
  • दळणापासून दूध खरेदी यासाठी रोज बाहेर जाणे 
  • दैनंदिन जीवन जगताना बदल करण्याचा, तडजोडीचा अभाव

 
आता असे भाग वाचवा! 

हे दोन भाग फक्त उदाहरणे आहेत. शहरातील असे अनेक भाग आहेत ते अजूनही संसर्गापासून शाबूत आहेत, काही बेजबाबदार असल्याने या भागातही संसर्गाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे आता जिथे फैलाव नाही ते भाग संसर्गापासून वाचविण्यासाठी प्रशासन व नागरिकांनीही सर्व आवश्‍यक उपाय करायला हवेत. 

या दहा भागांत कोरोनाचा ५७.२७ टक्के संसर्ग 

  • संजयनगर, मुकुंदवाडी - ९१ 
  • जयभीमनगर - ६३ 
  • रामनगर - ४४ 
  • किलेअर्क - ४१ 
  • नूर कॉलनी/टाऊन हॉल - ३७ 
  • आसेफिया कॉलनी - २९ 
  • बायजीपुरा - २५ 
  • पुंडलिकनगर - १८ 
  • कैलासनगर - १५ 
  • अभयपुत्र कॉलनी - १२ (समतानगर) 
  • एकूण - ३७५ (५७.४२ टक्के) 

वसाहतीनुसार संसर्गाचे प्रमाण 
 

  • दाट वसाहत - ७३.०४ (टक्के) 
  • विरळ वसाहत - ९.१८ (टक्के) 
  • राज्य राखीव बल - ११.४८ (टक्के) 
  • इतर ग्रामीणसह - ६.३० (टक्के) 
  • एकूण १०० टक्के 

पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दाट वसाहतींतील एकूण रुग्ण (टक्के) 
 

  • मुकुंदवाडी - १४३ 
  • सिटी चौक - १०१ 
  • बेगमपुरा - १२६ 
  • जिन्सी - ६९ 
  • पुंडलिकनगर - ३८ 
  • एकूण - ४७७ (७३.०४ टक्के रुग्ण) 

 
जवाहरनगर, एमआयडीसी सिडको, वेदांतनगर, सातारा (एसआरपीएफ ७५ वगळून), छावणी, सिडको या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सुनियोजित वसाहतींतील एकूण रुग्णसंख्या ६० असून येथे कोरोनाचे ९.१८ टक्के रुग्ण आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com