esakal | प्रतिक्षा यादीत जुनीच नावे, उर्वरित विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशात संधी देण्याची पालकांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

3RTE_82

आरटीई मोफत प्रवेश प्रकियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या यादीत पुन्हा चुका झाल्या असून, तिसऱ्यांना मुदतवाढ मिळाल्यावर यादीत जुनीच नावे आहेत. पोर्टलवरील चुकांमध्ये दुरुस्ती करुन, पात्र आणि उर्वरित विद्यार्थ्यांची नावे जाहिर करुन त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

प्रतिक्षा यादीत जुनीच नावे, उर्वरित विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशात संधी देण्याची पालकांची मागणी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : आरटीई मोफत प्रवेश प्रकियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या यादीत पुन्हा चुका झाल्या असून, तिसऱ्यांना मुदतवाढ मिळाल्यावर यादीत जुनीच नावे आहेत. पोर्टलवरील चुकांमध्ये दुरुस्ती करुन, पात्र आणि उर्वरित विद्यार्थ्यांची नावे जाहिर करुन त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.
नॉट अॅप्रोच विद्यार्थ्यांची नावे घुसवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गदारोळ होताच ताबडतोब यादी बदलली. मोफत प्रवेश प्रक्रिया प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू असताना हे विद्यार्थी आलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत याबाबत चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

राणेंच्या पत्रकार परिषदेवर अशोक चव्हाण म्हणाले, त्यांची किंमत काय? शिवसैनिकच योग्यवेळी उत्तर देतील

त्यासह अनेक शाळांबाबत विद्यार्थ्यांनी पर्याय दिले नसल्याने बहुतांश शाळांना योजनेतून शून्य प्रवेश असल्याचेही समोर आले आहे. आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी फेरी सुरू आहे. या प्रवेशासाठी आता २९ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या प्रतीक्षा यादीत विद्यार्थ्यांची नावे नव्हती. तर सोडतीत पात्र ठरलेल्या परंतू प्रवेश न घेतलेल्या (नॉच ॲप्रोच) वियार्थ्यांची नावे होती. हा प्रकार कमी की काय म्हणून आता पुन्हा मुदतवाढ मिळाल्यावरही पोर्टलवर जुनीच यादी दिसत असल्याचे पालकांनी म्हटले आहे.

तारीख पे तारीख
८ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबत शिक्षण विभागाने सूचना दिल्या होत्या. ही मुदत वाढवून २३ ऑक्टोंबर करण्यात आली होती. ही मुदत संपल्यावर पुन्हा मुदतवाढ देत आता २९ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी अवधी देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार जागा रिक्त आहेत. याबाबत पालकांनी शाळांमध्येही चौकशी केली असता जोपर्यंत ऑनलाईन संदेश मिळत नाहीत, तोपर्यंत काहीच करता येत नसल्याचे म्हटले आहे.

संपादन- गणेश पिटेकर