esakal | ट्रक-कारच्या अपघातात एक जखमी, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Car Accident.jpeg

गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथे सोमवारी (ता. 31) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार ( एमएच 18 बी सी 6219 ) व औरंगाबादकडे जाणारा मालवाहतूक ट्रक ( एमएच 20 सीटी 0880) यांची गल्लेबोरगाव बायपास वरून एकेरी वाहतुक सुरू असल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली.

ट्रक-कारच्या अपघातात एक जखमी, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

sakal_logo
By
बाबासाहेब दांडगे

गल्लेबोरगाव (जि.औरंगाबाद) : गल्लेबोरगाव (ता. खुलताबाद) येथे सोमवारी (ता. 31) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार ( एमएच 18 बी सी 6219 ) व औरंगाबादकडे जाणारा मालवाहतूक ट्रक ( एमएच 20 सीटी 0880) यांची गल्लेबोरगाव बायपास वरून एकेरी वाहतुक सुरू असल्याने समोरासमोर जोरदार धडक झाली.


यात कार मधील संभाजी पाटील ( वय 30 रा.धुळे) गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठवले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, पोलीस हेडकाॅन्स्टेबल रमेश धस, बाबुराव जाधव, शांताराम सोनवणे आदींनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

औरंगाबादेत भाजप कार्यकारिणी निवडीवरून गटबाजी, शहराध्यक्ष नाराज, खासदारांनी...

नॉन कोविड रुग्णांना ‘घाटी’त जागा नाही!
औरंगाबाद : एकीकडे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी चांगले कार्य करणाऱ्या घाटी रुग्णालयात कोविडशिवाय इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे. जागा नसल्याचे कारण देत टोलविले जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. घाटी रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांची परवड होत असल्याची व इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याची बाब समोर आल्यानंतर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने याची पडताळणी केली. त्यावेळी गंभीर बाबी समोर आल्या. कोरोनाची बाधा नसलेले; परंतु इतर आजारांनी त्रस्त रुग्ण; तसेच कोरोना संशयित व नॉन कोविड रुग्णांना अक्षरशः यातना सहन कराव्या लागत आहेत.


कोरोना संशयित रुग्णाला शुक्रवारी रात्री अपघात विभागात खाटेच्या प्रतीक्षेत तब्बल पाच तास स्ट्रेचरवरच ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दम्याचा आणि श्‍वासोच्छ्वासाला त्रास जाणवत असल्याने एका महिलेला नातेवाइकांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात नेले; परंतु तेथे महिलेला रुग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ आली. काही वेळानंतर महिला रुग्णाला अपघात विभागात घेण्यात आले. रुग्णसंख्या जास्त असल्याने खाट उपलब्ध नसल्याचे सांगून तेथे एका स्ट्रेचरवर बराच वेळ महिला रुग्णाला ठेवण्यात आले.


(संपादन - गणेश पिटेकर)