तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय केलं)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

औरंगाबाद : विवाहितेला शरीर सुखाची मागणी करणारा आणि सतत पाठलाग करुन जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व साडेपाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम मोहम्मद युनुस यांनी ठोठावली. तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

या प्रकरणी शहरातील 38 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला तुषार हा फिर्यादीचा दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता व शरीर सुखाची मागणी करीत होता. विरोध केल्यानंतरही तो सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन एप्रिल 2014 रोजी दुपारी बारा वाजता फिर्यादी ही बाबा पेट्रोल पंपापासून ते सिडकोपर्यंत दुचारीवर जात असताना तुषारने तिचा पाठलाग केला व रस्ता अडवून पुन्हा एकदा शरीर सुखाची मागणी केली. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

क्लिक  करा- नासाची कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग...

वर्षभर सक्तमजूरी, पाच हजार दंड 
न्यायालयात खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तुषार उर्फ तुकाराम क्षीरसागर याला दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, तर इतर कलमान्वये 15 दिवस सक्तमजुरी व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला देण्याचेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. 

हे वाचलंत का?- म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year jail for demanding sexual relation