जिल्हा परिषदेच्या तत्कालीन महिला सदस्याचा त्याने पिरगाळला हात, न्यायालयाने केली ही शिक्षा (वाचा कुठे घडलंय)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या तत्कालीन महिला सदस्याचा "तू जिल्हा परिषद सदस्य आहेस, तरी देखील तू रस्त्याचे काम बरोबर केले नाही' असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचा हात पिरगाळत तिचा विनयभंग केल्याप्रकरणात आरोपी अली खॉं सांडू खॉं (36) या आरोपीला न्यायालयाने एक वर्षे सक्तमजूरी व साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

औरंगाबाद : रस्त्याचे काम व्यवस्थित केले नाही म्हणत, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून तिचा हात पिरगाळत विनयभंग केल्याप्रकरणातील आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी व विविध कलमांन्वये साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभिनंदन ज. पाटांगणकर यांनी ठोठाविली. आरोपी अली खॉं सांडू खॉं (36) असे त्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा- VIDEO : थर्टी फर्स्ट बेतला जिवावर, कार विहिरीत कोसळली, दोन ठार, तीन गंभीर

प्रकरणात 39 वर्षीय सदस्य महिलेने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, पीडिता व आरोपी हे एकाच गल्लीत राहणारे आहेत. 20 ऑक्‍टोबर 2013 रोजी पीडिता ही घरात कपडे धूत होती. त्यावेळी आरोपी अली खॉं तिच्या घरी आला. त्याने "तू जिल्हा परिषद सदस्य आहेस, तरी देखील तू रस्त्याचे काम बरोबर केले नाही' असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचा हात पिरगाळत तिचा विनयभंग केला. प्रकरणात आरोपी अली खॉं विरुद्ध ऍट्रॉसिटीच्या कलमासह इतर कलमानुसार सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे वाचलंत का?- Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम

सहा साक्षीदारांनी दिल्या साक्षी
प्रकरणात पोलिस उपाधीक्षक राम मांडुरके यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेसह प्रत्यक्षदर्शी व डॉक्‍टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून एक वर्षे सक्तमजुरी, चार हजार रुपये दंड व कलम 506 अन्वये तीन महिने सक्तमजुरी, पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार जे. आर. पठाण व पोलिस नाईक एस. सी. मोमीन यांनी काम पाहिले.

क्लिक करा- औरंगाबादच्या धूत रुग्णालयात डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One year jail to man for sexual harassment member of Zilla Parishad