esakal | Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

3JOBS.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या रिक्तपदाच्या माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करायचा आहे.

'बामु' विद्यापिठाचा एम.फिल. अभ्यासक्रम सुरूच राहणार

ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अर्ज करावे. या बाबत काही अडचण आल्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या ०२४०-२३३४८५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एम. बी. ए. अशा पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी या राहतील कंपन्या
मेळाव्यासाठी प्रामुख्याने जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्टीज लि., चौगुले इंडस्टीज प्रा. लि. पुणे, महावितरण कार्यालय, औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग, ॲसेंसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब, परम स्कील ट्रेनींग इंडीया प्रा. लि., औरंगाबाद, जे. के. मेटल इंजिनीअरींग वर्क्स, बीड, मॅक्स लाईफ इन्शुरन्स, औरंगाबाद, बी. डी. के. इलेक्ट्रोल्स, बीड, जी. एस. एल. फायनान्सियल सर्व्हीस, बीड, सेमिकॉन इंडिया, बीड, एसएमपी कॉर्पोरेशन, उस्मानाबाद, युनायटेड सेक्युरीटी फोरम, उदगीर,‍ लातूर, लक्ष्मी अग्नी कॉम्पोनन्ट ॲण्ड फॉरजिन्स प्रा.लि. औरंगाबाद, फेवराटा इंडस्ट्रीज, औरंगाबाद, इण्डुरन्स टेक्नॉलॉजीस लि. औरंगाबाद अशा नामांकित उद्योजकांनी २,४५१ ऑनलाईन रिक्तपदे अधिसूचित केलेली आहेत.

संपादन - गणेश पिटेकर