esakal | मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

1yashwantrao_chavan_maharashtra_open_university_ycmou_ycmou_nasik

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या औरंगाबाद केंद्रातर्फे बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारी (ता. तेरा) सुरू होत आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या औरंगाबाद केंद्रातर्फे बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारी (ता. तेरा) सुरू होत आहेत, अशी माहिती औरंगाबाद केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. राम माने यांनी दिली.
बीएच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने www.ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. रोज दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार असून, सकाळचे सत्र आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत असेल व दुपारचे सत्र तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत असेल.

पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, दोघांचा अपघातात मृत्यू

हा कालावधी काही संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन दिलेला आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लॉगीन केल्यानंतर त्याला परीक्षेसाठी फक्त एक तासाचा कालावधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व त्याला सुलभपणे घरी बसून परीक्षा देता यावी, म्हणून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी युजर मॅन्युअल तसेच ऑनलाइन परीक्षेसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी युजर मॅन्युअलचा वापर करून अंतिम परीक्षेसाठी सामोरे जायचे आहे. ऑनलाइन परीक्षेसाठीhtpps://ycmou.unionline.in/ ही लिंक आहे. तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विभागीय केंद्रातर्फे मदत कक्षाची स्थापना केली आहे. विद्यापीठाने तांत्रिक मदतनीसांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

काही परीक्षा सुरळीत
मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील मुक्त विद्यापीठात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षेला पाच ऑक्टोबरपासून सुरवात झाली आहे. विद्यार्थी अभ्यास केंद्रावर न जाता घरी बसूनच अँड्रॉइड मोबाईल व लॅपटॉपचा वापर करून परीक्षा देत आहेत. ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पालकांचा, मित्रांचा परीक्षा कालावधीमध्ये फोन किंवा लॅपटॉपचा वापर करण्यास परवानगी आहे.

संपादन - गणेश पिटेकर

go to top