
हा विषय मागे पडला आहे. नैतिक, सैद्धांतिक व कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचे कधीही समर्थन करणार शकणार नाही.
औरंगाबाद : राजकीय भांडवल केले जाऊ नये. त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये याची माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, या शद्बांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर बोलल्या आहेत. हा विषय मागे पडला आहे. नैतिक, सैद्धांतिक व कायदेशीर दृष्ट्या या गोष्टीचे कधीही समर्थन करू शकणार नाही. कोणीही असो मी राजकीय भांडवल केले नसते, असे मुंडे म्हणाल्या. औरंगाबादेत सोमवारी (ता.२५) त्या बोलत होत्या. आरोप केलेल्या महिलेने धनंजय मुंडेंच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली आहे.
औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!
ओबीसी चळवळीसाठी लढा देणार
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. ती जातीनिहाय हवी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. या समुदायाला न्याय देण्यासाठी गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे यांनी संसदेत आवाज उठवला आहे. ओबीसींचाच मुख्यमंत्री होणार हे फलक झळकले आहे यावर बोलताना मुंडे म्हणाल्या की या पासून मला बाजूला ठेवा.
संपादन - गणेश पिटेकर