सुटे पैसे आणण्यासाठी रस्ता ओलांडताना कारने दिली जोराची धडक, पादचाऱ्याचा मृत्यू

Accident
Accident

चित्तेपिंपळगाव(जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भालगाव (ता.औरंगाबाद) फाट्यावर बीडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने(एमएच २१ बीएफ ००४६) रस्ता ओलांडत असणाऱ्या पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने रविवारी (ता.एक) गंभीर जखमी झाले. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (ता.दोन) मृत्यू झाला आहे. मृताचे नाव गणेश कदम (रा.आपतगाव, ता.औरंगाबाद) असे आहे.


रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गणेश हे भालगाव फाट्यावर हॉटेलमध्ये सुटे पैसे आणण्यासाठी रस्ता ओलांडत असताना कारने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना लगेच स्थानिकांच्या मदतीने त्याचं कारमध्ये औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ही धडक एवढ्या जोराने होती की गणेश कदम हे जवळपास पाच फुटांपर्यंत कारसोबत फरफटत गेल्याने त्यांना जबर मार लागला होता. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले.


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आताच पूर्ण झाले असून रस्ता अनेक वर्षांनंतर चांगला झाला आहे. या महामार्गावर वाहने वेगमर्यादा पेक्षाही जास्त वेगाने धावताना दिसत आहेत. या पूर्वी गेल्या वर्षभरात अनेक दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने चालणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन वेग मर्यादा सोडून भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com