औरंगाबादेत पोलिसांना त्यांच्याच काठीने मारहाण 

मनोज साखरे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

अण्णाभाऊ साठे चौकात पोलिस सर्वच वाहनांची तपासणी करत आहे. मात्र येथे चौघांना थांबवून पोलिस चौकशी करत असतांना त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले.

 

औरंगाबादः लॉकाडाऊनच्या काळात पोलिस आणि आरोग्य यंत्रणा चोवीस तास ड्युटी बजावत असतांना काही जण विणाकारण बाहेर फिरत आहे. औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात वाहनांच्या तपासणी दरम्यान चौघांनी पोलिसांसोबत बाचाबाची करत त्यांच्या हातातील काठी हिसकावून पोलिसांनाच मारहाण केली.

अण्णाभाऊ साठे चौकात पोलिस सर्वच वाहनांची तपासणी करत आहे. मात्र येथे चौघांना थांबवून पोलिस चौकशी करत असतांना त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले.

यामध्ये पोलिसांनी प्रतिकार केल्यानंतर एका जणांने पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. यामध्य त्या व्यक्तीने ट्रफीक पोलिसाला बेदम मारहाण केली. यानंतर चौकातील सर्वच पोलिसांनी धाव घेत येथे या तरुणांना ताब्यात घेतले आहे. 

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात पोलिस नाकाबंदी आणि वाहन तपासणी करीत होते. लोकांना अडवून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले जात होते. पोलीस त्यांचे ड्युटी जीवाचे रान करून कर्तव्य  बजावत असताना
रस्त्याने आलेल्या एका टोळक्याला पोलिसांनी बाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलिसांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी पोलिसांचीच  काठी घेऊन सपासप मारायला सुरुवात केली. 

 यानंतर यानंतर टोळकं पसार झाले अशी माहिती सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. मारहाण करणाऱ्या माहिती काढली जात असून जखमी पोलिसांवरही प्रथम उपचार करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Beat Police Aurangabad News