किडके, सडलेले बटाटे पाणीपुरीत, नागरीकांचा विक्रेत्याला चोप 

शेखलाल शेख
Tuesday, 25 February 2020

दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला होता. संतापलेल्या या भागातील लोकांनी पाणीपुरीचे दुकान गाठलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडकी आणि सडलेले बटाटे पाणीपुरी मध्ये वापरली जात होती.

औरंगाबाद : टीव्ही सेंटर भागात एका पाणीपुरी वाल्यास नागरिकांनी चोप दिल्याची घटना घटली होती. दोन दिवसांपुर्वी घडलेल्या या प्रकरणातील व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटीचा त्रास होऊ लागला होता. संतापलेल्या या भागातील लोकांनी पाणीपुरीचे दुकान गाठलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडकी आणि सडलेले बटाटे पाणीपुरी मध्ये वापरली जात होती.

हेही वाचा - कर्जमाफी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भाजपचे धरणे 

लोकांनी दुकान गाठुन हेच बटाटे खाण्याचा आग्रह दुकानदाराला धरला. यानंतर नागरीकांनी पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केली. सध्या या मारहाण, शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या सगळ्या घटनतेनंतर पाणीपुरी चालकाने माफी मागितली. पुन्हा असं करणार नाही अशी ग्वाही त्याने हात जोडून दिली. त्यामुळे हे प्रकरण शमलं. मात्र पाणीपुरी खाल्ल्याने लहान मुलांना उलट्या चा खुप त्रास झाला.

हेही वाचा - महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम

शहरात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणीपुरी विक्री केली जाते. मात्र ही पाणीपुरी किती शुद्ध आहे. त्यात वापरले जाणारे पाणी कसे आहे याकडे कुणीच लक्ष देत नाही. अशुद्ध पाणी विक्रीच्या अनेक घटना याअगोदर सुद्धा घडलेल्या आहे. दोन दिवसांपुर्वी मुलांना चांगलाच त्रास झाल्याने नागरीकांनी टीव्ही सेंटर भागात विक्रेत्याला चांगलाच चोप दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People Beaten Panipuri Hawkers in Aurangabad