Breaking News: औरंगाबादेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

ई सकाळ टीम
Friday, 4 December 2020

औरंगाबाद शहरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर साखर कारखान्याकडे अडकलेले पैसे मिळावे यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर शुक्रवारी (ता.चार) पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर गंगापूर साखर कारखान्याकडे अडकलेले पैसे मिळावे यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर शुक्रवारी (ता.चार) पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. आंदोलकांनी रस्ता आडवला होता. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. हे सर्व शेतकरी जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील असून ती गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत.

अपहार प्रकरणामुळे कारखान्याचे खाते सील करण्यात आले आहे. लाठीचार्जच्या घटनेची माहिती कळताच आमदार प्रशांत बंब हे क्रांती चौकात दाखल झाले होते. पोलिसांच्या कारवाईमुळे बंब आक्रमक झाल्याचे दिसले. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Lathicharge On Farmers In Aurangabad