esakal | औरंगाबादच्या उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखान्यावर छापा, चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

कुंटणखाना उद्ध्वस्त करून चालकावर कारवाई केल्यानंतरही त्याने पुन्हा कुंटणखाना सुरू केला. बऱ्याच दिवसांनी याची कुणकुण लागल्यानंतर नव्याने आलेल्या औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांच्या पथकाने खाक्या दाखवीत बीड बायपास, सातारा परिसरातील कुंटणखान्यावर छापा घातला.

औरंगाबादच्या उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखान्यावर छापा, चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : कुंटणखाना उद्ध्वस्त करून चालकावर कारवाई केल्यानंतरही त्याने पुन्हा कुंटणखाना सुरू केला. बऱ्याच दिवसांनी याची कुणकुण लागल्यानंतर नव्याने आलेल्या पोलिस आयुक्तांच्या पथकाने खाक्या दाखवीत बीड बायपास, सातारा परिसरातील कुंटणखान्यावर छापा घातला. यात चौघांना ताब्यात घेण्यात आले. तुषार राजपूत हा कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (ता. १७) सायंकाळी करण्यात आली.

ट्रकने जोरदार धडक दिल्याने जावयाचा सासऱ्याच्या घरासमोरच मृत्यू, बैलही दगावला


पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तुषार राजन राजपूत (वय ३५, रा. छावणी), प्रवीण बालाजी कुरकुटे (३५, रा. आलोकनगर, बीड बायपास), दिनेश प्रकाश शेट्टी (रा. गुरू लॉन्सजवळ) व कैलास ब्रह्मदेव पासवान (रा. झारखंड) यांना ताब्यात घेतले. यासह उत्तर प्रदेशातील एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले. तीन वेळा कारवाईनंतरही तुषार राजपूत सहकाऱ्यांसोबत कुंटणखाना चालवीत होता.

युनिर्व्हसल हायस्कूलविरुद्ध शिक्षण विभागाची कारवाई, पालकांनी खासदार जलील यांच्याकडे केली होती तक्रार

त्यांचा कुंटणखाना पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाला शनिवारी मिळाली. त्यानंतर विशेष पथक व दामिनी पथकाने पंटरला बीड बायपास रोडवरील एका मोठ्या रुग्णालयामागील वरद ॲव्हेन्यू अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये पाठविले. त्यानंतर खात्री करून छापा घातला. यात उत्तर प्रदेशातील एका तरुणीसह तुषार, प्रवीण, दिनेश व कैलास पासवान यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल जप्त केले आहेत. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती.

परदेशी तरुणींही होत्या संपर्कात
छाप्यात पकडलेल्या संशयितांची साखळी असून त्यांचा संपर्क देशभर आहे. गोवा, मुंबई, दिल्ली, कोलकाता याशिवाय अन्य मेट्रो शहरे व परदेशातील देहविक्री करणाऱ्या तरुणीही त्यांच्या संपर्कात होत्या. रशियन तरुणींचे फोटोग्राफ्स त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.


संपादन - गणेश पिटेकर