
मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही आज गुरुवारी मनसेतर्फे मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.
औरंगाबाद : वीजबील प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्चाला परवानगी नव्हती. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना औरंगपुरा येथे गुरुवारी (ता.२६) पोलिसांनी अटक करून नेले. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार होता. सुहास दाशरथे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार होता. यात जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सुमीत खांबेकर, प्रकाश महाजन, दिलीप चितलांगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. तथापि, मोर्चा काढणार असल्याचे बुधवारी (ता.२५) मनसेतर्फे स्पष्ट करण्यात आले. सध्या कोरोनामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुरुवारच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आले होते.
संपादन - गणेश पिटेकर