हर्षवर्धन जाधव झाले पुन्हा भावूक, पत्रकार परिषद घेऊन म्हणाले...

Press conference of Harshvardhan Jadhav
Press conference of Harshvardhan Jadhav

कन्नड (जि. औरंगाबाद) : ‘‘राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मी कोचीन येथे जाणार होतो. परंतु, कोविड-१९ मुळे व माझ्या सोबत महत्त्वाची घटना घडल्यामुळे मला पिशोर येथे राहण्यास यावे लागले. माझी आई यपूर्वीच पिशोर येथे राहण्यास आलेली आहे. म्हणून आईला सोबत व्हावी व राजकारणापसून थोडे दूर जाता यावे यासाठी पिशोर येथे राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. पिशोर येथे मी छोटसं घरसुद्धा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित या निर्णयामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे, असे काही लोकांना वाटेल. परंतु, मी पुन्हा राजकारणात परतणार नाही’’, असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज (ता. २२ जून) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन जाधव हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी पूर्वीही सांगितले होते. आज पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘कदाचित कन्नड तालुक्यात पिशोर येथे राहायला आल्यानंतर काही राजकीय मंडळींना असे वाटू शकते की, मी पुन्हा राजकारणात सक्रिय होत आहे. परंतु, मी राजकारणापासून पूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवले आहे. यानंतर मी कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची  किंवा विधानसभेची निवडणूक लढविणार नाही. माझ्यापासून राजकीय फायदा होईल म्हणून कोणी माझ्या सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असाल तर त्यांनी मला कृपया भेटू नये. परंतु, माझ्या आमदारकीचा अनुभवाचा कुणाला फायदा होत असेल किंवा समाजासाठी उपयोग होत असेल तर सामाजिक कार्यात मी सर्वतोपरी मदत करेल. कारण हे माझे कर्तव्यसुद्धा आहे ज्या जनतेने माझ्या कुटुंबाला जे प्रेम दिले आहे ते परत फेडणे हे माझे कर्तव्य आहे. आता माझी स्वतःची व माझ्या आईची तब्येतीची काळजी ही माझ्यासाठी सर्वांत प्राधान्याची गोष्ट आहे.

मध्यंतरी मला खूप नैराश्य आले होते. मी आत्महत्याच्या निर्णयापर्यंतसुद्धा पोचलो होतो. परंतु, मी त्यातून आताच सावरलो आहे. प्रत्येकाचे खासगी व व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे असतात तसेच माझेसुद्धा आहे माझी राजकीय आणि वैयक्तिक जीवन हे वेगवेगळे गोष्टी आहे. माझ्या राजकीय भूमिका आता पूर्णपणे संपलेला आहे. या नंतर माझी कुठलेही वक्तव्य ही राजकीय टीकाटिपणी किंवा राजकीय आरोप म्हणून कुणीही गृहित धरू नये. सामाजिक भावनेतून व एक नागरिक म्हणून मी ते बोललो आहे असे समजावे.

मागे एका वेळी मला तालुक्याचे आमदार म्हणाले होते की, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला घेईल. म्हणून त्यांना सांगावेसे वाटते की मुख्यमंत्री हे शिवसेनेची आहे आमदारमहोदय आपणसुद्धा शिवसेनेचे आहात म्हणून तालुक्यासाठी आपण याचा जास्तीत-जास्त फायदा करून घ्यावा. कृपया उपदेश कुठल्याही राजकीय भावनेतून केलेला नसून एक नागरिक या नात्याने मी बोलत आहे.’’

 आता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...
 
संजना जाधव यांच्या पाठीशी राहा
‘‘याचा कुठलाही राजकीय गैरअर्थ कुणीही काढू नये किंवा मी कुठलीही टीका आमदार महोदयांवर करीत नाही हे पुन्हा निक्षून सांगत आहे. येणाऱ्या काळात संजना जाधव यांच्या पाठीशी माझ्या मतदारांनी उभे राहावे, घरगुती कलह हा विषय हा विषय वेगळा आहे. माझा राजकीय विषय आता संपलेला आहे’’, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य जाधव हा उपस्थित होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com