औद्योगिक क्षेत्राचे कोरोनाशी दोन हात, कंपन्या घेताहेत अशी काळजी

Preventive Measures Are Taken Of Corona By MIDC
Preventive Measures Are Taken Of Corona By MIDC
Updated on

औरंगाबाद  : कोरोनाने आता औद्योगिक क्षेत्रातही शिरकाव केला आहे. वाळूजमधील एका नामांकित कंपनीत २० कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची बाधा झाली. दरम्यान, इतर कंपन्यांनी सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची प्रणाली आणखी सक्षम केली आहे. कोरोनाची भीती मनात न ठेवता त्याच्याशी लढत औद्योगिक क्षेत्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न कंपन्यांतर्फे केला जात आहे. 

लॉकडाउनमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले औद्योगिक क्षेत्र आता कुठे रुळावर येत असताना काही कंपन्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले. मुळात कंपन्या फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर याचा प्रभावी वापर व शासकीय नियमांचा पूर्ण वापर करीत या कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले होते. 

वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन येथील एमआयडीसीतील प्रत्येक कंपनीत सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. त्यानुसार ४० ते ५० टक्केच कामगारांवर कंपनीचे उत्पादन सुरू आहे. फिजिकल डिस्टन्ससाठी कंपन्यांनी स्ट्रक्चर बदलले. लाइनवरील कामातही बदल झाला. मुळात कामगारांमध्ये ही जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे ते स्वतःहून मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. एका नामांकित कंपनीचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे इतर कंपन्या आणखी सावधानता बाळगत विशेष काळजी घेत आहेत.

कंपन्या अशी घेताहेत काळजी 
  

  • गेटवरच शरीराचे तापमान आणि शरीरातील ऑक्सिजनची तपासणी. 
  • कर्मचाऱ्याला पूर्णपणे सॅनिटाईज केले जाते. 
  • कामाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्स पाळला जातो. 
  • गर्दी टाळण्यासाठी जेवणाच्या वेळाही बदलण्यात आलेल्या आहेत. 
  • मास्क नसल्यास कामगार, कर्मचाऱ्यास परत पाठवण्यात येते. 
  • कामगारांना जागेवर चहा दिला जात आहे. 
  • कामगारांना तापमान व ऑक्सिजनची तपासणी करूनच घरी पाठवण्यात येत आहे. 

 
  

वाळूजमध्ये कोरोनाचा संसर्ग हा शहरातूनच आला आहे. कंपन्यांतर्फे विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कंपनीतच काम करणारे पॉझिटिव्ह झाले, असे म्हणता येणार नाही. दुसरे अजून वाळूज परिसरात रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, ती नियंत्रणात आणण्यासाठी घाटीप्रमाणे मोठे रुग्णालय या परिसरात नाही. कंपनी पूर्ण काळजी घेते. कामगारांनीही पूर्ण काळजी घ्यावी. 
- जी. के. संगनेरिया, अध्यक्ष, सीएमआयए 

 

आम्ही मासिआच्या माध्यमातून जनजागृती करीत आहोत. कामगारांचे छोटे-छोटे ग्रुप करावेत. फिजिकल डिस्टन्स ठेवावे, मास्कचा वापर करावा, दोन शिफ्टमध्ये गॅप ठेवून काम करावे, दिलेल्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. शरीराचे तापमान व ऑक्सिजनची तपासणी सातत्याने करावी. याविषयीचा एक व्हिडिओ आम्ही तयार करून सर्व लघुउद्योजकांना पाठवला आहे. त्यानुसार उद्योजकांनी त्याचा वापरही सुरू केला आहे. 
- अभय हंचनाळ, अध्यक्ष, मासिआ 

 
कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. त्यामुळे सर्वजण स्वतःची काळजी घेत आहेत. कंपन्या आपल्या परीने प्रत्येक कामगारांवर लक्ष ठेवून आहेत. पूर्वी भीती होती. मात्र, आता भीती दूर होऊन कोरोनाविषयी लढा देत काम करण्याची तयारी कामगार, कर्मचारी व उद्योजकांनी केली आहे. 
- सुनील किर्दक, उद्योजक  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com