Breaking : औरंगाबाद शहरात या तारखेपासून जनता कर्फ्यू 

राजेभाऊ मोगल
Monday, 6 July 2020

जनता कर्फ्यू असला तरी संचारबंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात नागरिकांनी तयारी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी (ता. सहा) झालेल्या प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय लोकप्रतिनिंच्या बैठकत घेण्यात आला. जनता कर्फ्यू असला तरी संचारबंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात नागरिकांनी तयारी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासोबतच ग्रामीण भागातही घट्ट होत आहे. वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे वाळूजला चार जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू करायची का? यासाठी सोमवारी बैठक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. बैठकीला खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन कानन येळीकर यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

दरम्यान उदय चौधरी यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोक सहकार्य करीत आहेत. सर्वांच्या चर्चेतून १० पासून १८ जुलैपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात येईल. नागरिकांनी आतापासूनच किराणा, भाजीपाला आणून ठेवावा. कोणीही पॅनिक होऊ नका, तयारी करण्यासाठी दिवसाचा वेळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभागी व्हावे, याकाळात आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत. 

हे राहणार बंद 
जनता कर्फ्यूच्या काळात फळ, भाजीपाला, किराणा दुकाने बंद ठेवले जाणार आहेत. असे असले तरी कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी महापालिकेचे आयुक्त घेतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public curfew in Aurangabad city during this period