esakal | रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात तेराशे कोटींचे पीककर्ज वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

crop-loan-allocation-washim-kharip

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीसाठीही पीक कर्ज वाटप प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे.

रब्बी हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात तेराशे कोटींचे पीककर्ज वाटप

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात रब्बीसाठीही पीक कर्ज वाटप प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.१४) २ लाख ६२ हजार ४७१ सभासदांना १ हजार ३६० कोटी ३० लाख २० हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहेत. यात जिल्हा बँक, ग्रामीण बँकेसह खाजगी बँकांनी कर्ज वाटपात आघाडी घेतली असल्याची माहीती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. जिल्ह्यात खरीप व रब्बीसाठी देण्यात आलेले उद्दिष्टपूर्तीसाठी बँकातर्फे काम करण्यात येत आहेत. खरीपासाठी उद्दिष्टापेक्षा जास्त वितरण करण्यात आले. रब्बीसाठी बँकांनी कंबर कसली असून यातही बँकांनी अडीच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहेत.

यात जिल्हा बँकेतर्फे १ लाख ६६ हजार ३४६ शेतकऱ्यांना ५२३ कोटी ८१ लाख ९७ हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहेत. यासह व्यापारी बँकातर्फे ६९ बजार ७६५ सभासदाना ६३६ कोटी ४ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे २६ हजार ३६० सभासदाना २०० कोटी ४३ लाख ९६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहेत. असे जिल्ह्यात एकूण ११३.६६ टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहेत. यात तीन हजार६९२ नवीन सभासदाना २५८ कोटी ५ लाख २८ हजार रुपयांची कर्ज वाटप करण्यात आले. यासह कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या ४५१ शेतकऱ्यांना १४४ कोटी. १७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहेत.

Edited - Ganesh Pitekar