मराठवाड्यात तीन लाख २८ हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा

अनिल जमधडे
Monday, 28 September 2020

सर्वाधिक तीन लाख २० हजार ९२६ हेक्टर पिकांची नासाडी औरंगाबाद विभागात झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे विभागातील प्राथमिक पाहणीअंती जिरायत, बागायत व फळपिके असे तीन लाख २८ हजार १५० हेक्टर पिकांचे (३३ टक्क्यांपेक्षा अधिक) नुकसान झाले. सर्वाधिक तीन लाख २० हजार ९२६ हेक्टर पिकांची नासाडी औरंगाबाद विभागात झाली आहे, तर लातूर विभागामध्ये सात हजार २३४.९ हेक्टर पिके पावसामुळे वाया गेले आहेत.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १७३.३ टक्के पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातही दीडशे टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. लातूरच्या तुलनेत औरंगाबाद विभागात पाऊसही अधिक झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. विभगातील १८९६ बाधित गावांमधील ४ लाख ९८ हजार ५७३ शेतकऱ्यांचा खरीप पावसाने बुडवला, तर लातूर जिल्ह्यातील दोन गावांमधील १४ हजार ८६४ शेतकऱ्यांना नुकसान झाले.

CoronaUpdate:औरंगाबादेत २१४ जण पॉझिटिव्ह, जिल्ह्यात २६ हजार ११६ झाले बरे

अद्याप विभागात पंचनामे सुरूच असून अद्याप पावसाचे दोन आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत अधिक पाऊस झाला तर नुकसानीच्या हेक्टरमध्ये भर पडू शकते. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १७३.४ टक्के, जालना १६१.४, बीड १३०.२, लातूर ११०.०, उस्मानाबाद १०४.८, नांदेड १०४.१, परभणी १११.३ तर हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १२४ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्हानिहाय नुकसान (औरंगाबाद विभाग)
जिल्हा---------------------------बाधित क्षेत्र
औरंगाबाद------------------------४७३८६.४
जालना-------------------------२६५१४३
बीड-------------------------------८३९७
---------------------------------------------.
एकूण----------------------------३२०९२६

परीक्षेचे काम चार दिवस ठप्प, कुलगुरू प्रमोद येवले संपर्काबाहेर

जिल्हानिहाय नुकसान (लातूर विभाग)

जिल्हा--------------------------- बाधित क्षेत्र

लातूर-------------------------------निरंक

उस्मानाबाद -------------------------निरंक

नांदेड----------------------------------१३५१.५८

परभणी-------------------------------२०.८९

हिंगोली---------------------------------५८६१.६२

-----------------

एकूण विभाग----------------------------७२३४.०९ हेक्टर

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Damages Over Three Lakh 28 Thousand Hectors Crops