esakal | पिके झाली भूईसपाट, शेतकरी संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

Rain In Lohgaon

औरंगाबाद जिल्ह्यातील लोहगाव परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला.

पिके झाली भूईसपाट, शेतकरी संकटात

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरूडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगावसह (ता.पैठण) परिसरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (ता.दोन) दुपारी तळपत्या उन्हात अचानक ढग जमा होऊन हस्ता नक्षत्राचा जोरदार वादळी पावसाने बाजरीची सोंगणी मळणी, कापूस वेचणी, कांदा, आद्रक, निंदणीची लगबगीत असलेल्या शेतकरी महिलांना झोडपत झाडे व पिके भुईसपाट केली आहेत.

सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासुन पाऊस थांबल्याने शेतकरी थोडेफार पिक पदरात पाडण्यासाठी, शिवारातील बाजरी सोंगणी, कापणी, मळणी, काळवडलेला कापूस, वेचणी, कांदा, आद्रक, पिक, फवारणी, निंदणी व रब्बी पेरणी कामात व्यस्त असताना शुक्रवारी दुपारी अचानक लोहगावसह परिसरात तासभर जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे, ऊस, कापूस, पिक भुईसपाट पिकात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले.

मशीनसमोर उभे राहा; कळेल शरीराचे तापमान, मिळतील ग्लोव्हज, मास्क! औरंगाबादकर...

वादळाने अनेक झाडे उन्मळुन पडली. वीज खांब वाकले, तर लोहगाव येथे डॉ. नामदेव जाधव यांच्या घरासमोरील मोठे वडाचे झाड उन्मळुन पडले. त्याखाली राजेंद्र वाघ यांची मोटारसायकल दबुन नुकसान झाले. बाजारपट्टीला तलावाचे स्वरूप आले. मावसगव्हाण, लामगव्हाण रस्त्यावर गुडघे भर पाण्यातून वाट काढताना हाल झाले.


मका पिकाचे नुकसान
सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या अतिवृष्टीत वेचणीवर आलेला कापूस आणि कापणी करून ठेवलेल्या मका पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे संयुक्त पाहणी पथकांना स्पष्ट झाले आहे. मात्र नुकसानीने बाधित झालेल्या खरिपाच्या तुटपुंजे हाती आलेले उत्पन्न विक्रीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

त्यामुळे या नुकसान झालेल्या पिकांचा पैसाही हाती येईना आणि शासन पातळीवर मदतीचा निकषही ठरेना या गुंतागुंतीत शेतकरी अडकला आहे. घरात ओला झालेला कापूस वेचणी करून ठेवला आहे, परंतु या कापसाला व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करत आहे. कापणी करून ठेवलेला मका पिकांची शेतातच माती झाली असून मक्याची कणसे शेतात कुजली असल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. जरंडी मंडळात झालेली अतिवृष्टीत कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी आणि बाजरी आदी पिकांना मोठा फटका बसलेला आहे.

हिमरु नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार...

संपादन - गणेश पिटेकर