(व्हिडिओ पाहा) राजू शेट्टी म्हणतात, राज्य सरकारची कर्जमाफी विनाकामाची 

Raju Shetti
Raju Shetti

औरंगाबाद : ""केंद्र सरकारने 15 लाख टन तुरीची आयात केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तूर आयात केली नसती तर क्विंटल मागे 2,300 रुपयांचे नुकसान झाले नसते. केंद्र सरकारची यासारखी चुकीची धोरणे शेतकऱ्यांना नडताहेत; तसेच राज्य सरकारची कर्जमाफी ही विना कामाची आहे'', अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. शहारात रविवारी (ता. नऊ) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

श्री. शेट्टी म्हणाले, ""सराकरने तुरीचा भाव पाच हजार 800 रुपये जाहीर केला असला तरी बाजारभावात मात्र शेतकऱ्यांना चार हजार 300 रुपयेच मिळत आहेत. अशा चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खास करून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना केंद्र सरकार अर्थसंकल्पामध्ये दिलासा देईल अशी अपेक्षा होती; मात्र तीही फोल ठरली. केंद्राने केवळ 1 लाख 60 हजार कोटींची तरतूद करून तोंडाला पाने पुसली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने राज्यभरातील दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीची पाहणी केली. या पथकाने शिफारशी केल्यानंतर शेतकऱ्यांना आशा लागली होती; पण शेतकऱ्यांचे हात कोरडेच राहिल्याचेही शेट्टी म्हणाले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, कृष्णा साबळे यांच्यासह कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते. 

स्वाभीमानी लढणार औरंगाबाद महापालिका 
""राज्य सरकारची तकलादू व विनाकामाची कर्जमाफी, कापूस, तूर पिकांना हमीभावापेक्षा कमी किमतीने भाव मिळणे, सातबारा कोरा व्हावा यासाठी व्यापक जनआंदोलन करण्यासाठी राज्यकारिणी उभारणार आहे. पररदेशातून आलेले घुसखोर हाकललेच पाहिजेत. सीएए कायदा लोकसभेत संमत करताना लोकशाहीचा भंग झाल्याने स्वाभीमानीचा विरोध असणार आहेत. स्वच्छ चेहऱ्याचे उमेदवार स्वाभीमानीकडे आले आलेत, हे चेहरे घेऊन औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उतरणार आहे, अशी माहितीही शेट्टी यांनी दिली.

नवीन कार्यकारिणी निवडणार 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बांधणी करण्यासाठी श्री. शेट्टी दौरा करीत आहेत. यात प्रत्येक जिल्ह्यात ते नवीन कार्यकारिणी निवडत आहेत. 20 फेब्रुवारीला दौरा संपेल. 22 फेब्रुवारीला शिर्डी येथे जिल्हा, विभागीय व प्रदेश पातळीवरील कार्यकारिणीची निवड होणार आहे. यावेळी स्वाभिमानीचे मारोती वऱ्हाडे, पश्‍चिम चंद्रशेखर सोळुंके तर औरंगाबाद जिल्हाअध्यक्षपदी कृष्णा साबळे यांची निवड करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. या कार्यकारिणीवर शिर्डी येथील राज्य कार्यकारिणीत मान्यता दिली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com