esakal | Covid-19 : सावधान! औरंगाबादेत रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, आणखी एक बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Reports 46 New Covid-19 cases, one death in Aurangabad

आज ५२  रुग्ण, एकूण १,४५३ बाधित

Covid-19 : सावधान! औरंगाबादेत रुग्ण संख्येत पुन्हा वाढ, आणखी एक बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद  - औरंगाबादेत कोरोनाचा बळींवर बळी जात असून खासगी रुग्णालयात आज (ता. 29) 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आता एकुण बळींचा आकडा 69 झाला. सलग सहा दिवस कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आज 52 कोरोनाबाधित रुग्णांना लागण झाल्याचे अहवालातुन स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. 28) 45 रुग्ण वाढले असुन दोन दिवसातच 97 जण बाधीत आढळले. आता कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 459 झाली आहे. 
 
69 वा मृत्यू   
खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हडको एन-12 येथील 65 वर्षीय पुरुषाचा आज (ता. 29) सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांना 21 मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी 23 मे रोजी पॉझिटीव्ह आली. त्यांना कोवीडच्या बाधेसह न्युमोनिया झाला व त्यांना मधुमेहही होता. 

हृदयद्रावक : नोकरी गेली, म्हणाला, ‘सोडून जाणार नाही मी तुला’ अन्...
 
औरंगाबादमध्ये आज आढळलेले 52 रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) - 
नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन 4 विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन 11 हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), जुना बाझार, अझिम कॉलनी (1), बायजीपुरा (2), एन सहा चिश्तिया कॉलनी (1), मंझूरपुरा (1) , राम नगर (1),  दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2)  या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  18 महिला आणि 34 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
 
आतापर्यंत 937 झाले बरे.. 
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 9 रुग्ण,  जिल्हा रुग्णालयातून 12 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. यासह येथील आधीचे, महापालिकेच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये येथून आतापर्यंत एकूण 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. 
 
कोरोना मीटर 

  • बरे झालेले रुग्ण - 937
  • उपचार घेणारे रुग्ण - 453
  • एकूण मृत्यू - 69
  •  जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1459