esakal | चुटकीसरशी लावा आता सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News Ketki Kokil

नवउद्योजकांनी समाजाची अडचण जाणून घेऊन तशी उत्पादने बनवली कि, ती गरजूंच्या पसंतीस उतरतात. याचा प्रत्यय केतकीला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवातील एक्‍स्पोमध्ये येत आहे. म्हणूनच या यंत्राबाबत जाणून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

चुटकीसरशी लावा आता सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : एखाद्या दुकानातून सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी महिला, मुलींना अवघड्यासारखे होते, तशीच स्थिती वापरलेल्या नॅपकिनची विल्हेवाट लावतानाही होते. त्यातूनच "झिरो पॅड' या यंत्राची निर्मिती झाली. पर्यावरणाची हानी न करता दोन, पाच, दहा नॅपकिनची अर्ध्या तासातच विल्हेवाट लागते. असे निर्माती केतकी कोकीळ या तरुण उद्योजिकेने "सकाळ'ला सांगितले. हे यंत्र बसविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, कार्यालये पुढाकार घेत आहेत.

नवउद्योजकांनी समाजाची अडचण जाणून घेऊन तशी उत्पादने बनवली कि, ती गरजूंच्या पसंतीस उतरतात. याचा प्रत्यय केतकीला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवातील एक्‍स्पोमध्ये येत आहे. म्हणूनच या यंत्राबाबत जाणून घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केतकी कोकीळने एमआयटी पुणे येथून एम.टेक.ची पदवी घेतल्यानंतर संजय ग्रुपअंतर्गत इको सेन्सची अप्लायन्सची सुरवात केली. दोन वर्षापासून 12 जणांची टीम "झिरो पॅड' यंत्रासाठी कार्यरत होती. नोव्हेंबरमध्ये हे यंत्र लॉंच केले असून आतापर्यंत 50 यंत्रे बनविली आहेत.

हेही वाचा : महाविद्यालयेच बंद केल्याने उतरली अभियांत्रिकीची सुज - डॉ. अभय वाघ

सॅनिटरी नॅपकिन जाळत असताना निघणाऱ्या धुराची पर्यावरणाला हानी होऊ नये, यासाठी आरएनडी हेड अक्षांश कटारिया यांनी वर्षभर अभ्यास केला, यात त्यांना यश आले. यंत्राबाबत पेटंट फाईल केले असून सध्या अवघ्या दहा हजारात हे यंत्र उपलब्ध होत आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी बाजारात आलेले हे यंत्र लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केतकी आणि त्यांची टीम स्वत: शाळा, महाविद्यालये, कार्यालये, बॅंकांमध्ये जाऊन मुली, महिलांमध्ये जागृती करण्याचे काम करत आहेत.

कसे आहे झिरो पॅड..

दोन, पाच आणि दहा सॅनिटरी नॅपकिनचे एकाचवेळी विघटन होईल, अशी तीन प्रकारची यंत्रे बनविण्यात आली आहेत. पुर्ण मेटल बॉडी असून 800 डिग्री तापमानात नॅपकिनची अर्ध्या तासातच राख तयार होते. एका पॅडची 0.2 ग्रॅम एवढी राख तयार झाल्यानंतर ती डस्टबीन किंवा मातीतही टाकता येते. विजेवर चालणारे हे यंत्र शाळा, महाविद्यालये, कार्यालयांमध्ये बसविले जात आहे.

हेही वाचा - 

अॅकॅडमिक ऑडिट नसल्यास महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द

मी मुलगी असल्याने अडचण माहित होती. डस्टबीनमध्ये टाकलेले सॅनिटरी नॅपकिन कुठे जाते, याचा माग घेतला तर, कचरा शॉर्टिंग करणाऱ्या महिलांनाही याचा त्रास होत असल्याचे लक्षात आले. यामुळेच यावर काम करण्याचा निर्णय घेतला. ते योग्य पद्धतीने जाळावे आणि तसे यंत्र बाथरुममध्येच असले तर किती बरे होईल. यातूनच कल्पनेला मुर्त रुप येण्यासाठी प्रेरणा मिळाली.
- केतकी कोकीळ, संचालक, इको सेन्स अप्लायन्स.

go to top