esakal | राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; रंगल्या राजकीय चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण हे विधान वाचून आपण जरा दचकालच, वरवर हे वाचून कुणीही आश्‍चर्यचकितच होतील.

राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, देवेंद्र फडणवीस एकाच विमानात; रंगल्या राजकीय चर्चा

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण हे विधान वाचून आपण जरा दचकालच, वरवर हे वाचून कुणीही आश्‍चर्यचकितच होतील. पण ते एकाच विमानाने औरंगाबादहून प्रवास करीत असल्याने सोबत आहेत बस्स एवढच! एकाच विमानाने ते मुंबईला गेले आहेत. दरम्यान रात्री नऊ वाजता ते मुंबई विमानतळावर उतरले.


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित उमेदवार सतीश चव्हाण यांनी ५८ हजारांवर मताधिक्य घेत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी सतीश चव्हाण आज रात्रीच्या विमानाने ते मुंबईला रवाना झाले. चव्हाण यांच्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक व राष्ट्रवादीचे अभिजित देशमुख, रोहित देशमुख, सतीश चव्हाण यांचे प्रचारप्रमुख नितीन बागवे होते.

याच विमानात देवेंद्र फडणवीसही होते. ते हिंगोलीला एका लग्नसमारंभासाठी गेले होते. फडणवीस हे मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर पोचले व त्याच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत आमदार प्रशांत बंबही होते. उभयंतात प्रवासादरम्यान झालेल्या निवडणुकीसह इतर राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे सोशल मीडियावर शेअर झालेल्या छायाचित्रावरुन दिसत आहे.

विमानातही सोशल डिस्टन्सिंग
विमानात खिडकीशेजारी देवेंद्र फडणवीस बसले होते. मधले सीट रिकामे ठेवून त्याबाजूच्या सीटवर सतीश चव्हाण बसले होते. त्यांचा एकत्रित फोटोही सकाळ ला प्राप्त झाला आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

go to top